बीएसएफ आणि आसाम पोलिसांनी मंगळवारी केलेल्या संयुक्त कारवाईत एका ट्रकमधून ४७ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.
नवी दिल्ली - बीएसएफ आणि आसाम पोलिसांनी मंगळवारी केलेल्या संयुक्त कारवाईत एका ट्रकमधून ४७ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाला अटक केली आहे. या प्रकरणातील अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. लवकरच इतर तस्करांना अटक करण्यात येईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिझोरामहून त्रिपुरामार्गे करीमगंजकडे जाणाऱ्या ट्रकमध्ये कोट्यावधी रुपयांचे हेरॉईन नेले जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. माहितीवर कारवाई करत, बीएसएफ आणि करीमगंज पोलिस कर्मचाऱ्यांनी मंगळवारी पहाटे न्यू करीमगंज रेल्वे स्थानकाजवळ एका ट्रकमधून हेरॉइन जप्त केले. ट्रकमधील ड्रायव्हरच्या केबिनमध्ये हेरॉइनने भरलेल्या ७६४ साबणाच्या पिशव्या लपवल्या होत्या. जप्त केलेल्या हेरॉईनचे वजन सुमारे ९.४७ किलो असून त्याची किंमत ४७.४ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
आसामचे मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, 'सत्तेत आल्यापासून राज्यभरात बंदी असलेले पदार्थ जप्त करण्याची मोहीम सुरू आहे. ९८.६५ किलो हेरॉईन, ३२२९३.७१ किलो गांजा, १८७.०५ किलो अफू, २६८१०४ कफ सिरपच्या बाटल्या, ४८४१८४२ कॅप्सूल, ४.९१ किलो मॉर्फिन, १४.७ किलो मॉर्फिन, १४.७ किलो क्रिस्टल मेथामफेटामाइन, ३१ किलो कोकीन आणि २१३.९४ किलो इतर अंमली पदार्थ फटिकांच्या साठ्यात समावेश आहे. या ड्रग्जची बाजारातील किंमत सुमारे ६५५.४१ कोटी रुपये आहे. गेल्या एक वर्षभरात एकूण ४,७५१ जणांना अंमली पदार्थांच्या व्यापारात सहभागी असल्याबद्दल अटक करण्यात आली होती.'
COMMENTS