अहमदनगर | नगर सह्याद्री विविध माध्यमांद्वारे जाहिरातीद्वारे जाहिरात संस्था तुमचे उत्पादन शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून बाजारपेठ उपलब्ध करून...
अहमदनगर | नगर सह्याद्री
विविध माध्यमांद्वारे जाहिरातीद्वारे जाहिरात संस्था तुमचे उत्पादन शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून बाजारपेठ उपलब्ध करून देत व्यवसायाला वृद्धींगत करण्याचे व दिशा देण्याचे काम करतात. समाजाला जाहिरातीचे महत्त्व पटावे, यासाठी राष्ट्रीय जाहिरात दिन साजरा केला जातो. यानिमित्त सामाजिक भावनेतून व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मातोश्री वृद्धाश्रमास मदत करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे, असे फेडरेशन ऑफ डव्हर्टायझिंग ण्ड मार्केटिंग एन्त्रप्रुनर्स (फेम)चे कार्यकारिणी संचालक श्रीकांत मांढरे यांनी सांगितले.
राष्ट्रीय जाहिरात दिनानिमित्त अ.नगर जिल्हा जाहिरातदार संघटना व फेडरेशन ऑफ अॅडव्हर्टायझिंग अॅण्ड मार्केटिंग एन्त्रप्रुनर्स (फेम) यांच्यावतीने मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना फळे व दिवाळीचे साहित्य देण्यात आले. यावेळी मांढरे बोलत होते. याप्रसंगी ‘फेम’चे उपाध्यक्ष प्रफुल्ल मुथा, संघटनेचे अध्यक्ष नितीन देशमुख, उपाध्यक्ष गुलशन अरोरा, सचिव प्रसाद मांढरे, सदस्य सुरेंद्र मुथा, पदाधिकारी व सदस्य, तसेच वृद्धाश्रमचे व्यवस्थापक महावीर जैन व कर्मचारी उपस्थित होते.
अध्यक्ष नितीन देशमुख म्हणाले की, आठवड्यावर दिवाळी येऊन ठेवली असून, मातोश्री’तील ज्येष्ठांना थोड्याफार प्रमाणात दिवाळीचा आनंद मिळावा, या उद्देशाने दिवाळीसाठीच्या उपयुक्त वस्तुंसह फळे देण्यात आली, असे सांगून उद्योग, व्यवसाय व कंपन्यांसाठी जाहिरात संस्था मार्गदर्शक ठरत असल्याचे सांगितले.
उपाध्यक्ष गुलशन अरोरा म्हणाले की, मागील अनेक वर्षांपासून आम्ही राष्ट्रीय जाहिरात दिन सामाजिक उपक्रमांनी साजरा करीत आहोत.
COMMENTS