स्पर्धा-परीक्षा विषयावर अहमदनगर महाविद्यालयात व्याख्यान अहमदनगर | नगर सह्याद्री परिश्रम व सातत्याने प्रयत्न केल्यास यश प्राप्त होते. स्पर्धा...
स्पर्धा-परीक्षा विषयावर अहमदनगर महाविद्यालयात व्याख्यान
अहमदनगर | नगर सह्याद्री
परिश्रम व सातत्याने प्रयत्न केल्यास यश प्राप्त होते. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना संयम, वेळेचे नियोजन आणि गट चर्चा करणे आवश्यक आहे. अभ्यास करत असताना गतकालीन घटना, घटना मागील कारणे, त्याच्या समाज जीवनावर होणारा परिणाम आणि त्यासाठी काय उपाय योजना करण्यात आल्या, या पद्धतीने प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम निहाय व घटकनिहाय अभ्यास करणे कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक आहे. परीक्षेत यश प्राप्तीसाठी आपण कोणत्या शाखेचे विद्यार्थी आहोत हे महत्वाचे नाही, तर आपली कष्ट करण्याची तयारी व अभ्यासातील सातत्य महत्वाचे आहे. स्पर्धा परीक्षेत सतत प्रयत्न करूनही अपेक्षित यश मिळत नसेल तर आपण खचून न जाता पर्यायी मार्ग शोधने गरजेच असते, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी केले.
अहमदनगर महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन व तयारी यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी जि.पो.अधिक्षक पाटील बोलत होते. याप्रसंगी त्यांचा सत्कार .प्राचार्य आर. जे. बार्नबस यांच्या हस्ते शाल, व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. याप्रसंगी कॉलेजचे उपप्रचार्य प्रा. डॉ. प्रितम कुमार बेदरकर, उपप्रचार्य प्रा. डॉ. नोयल पारगे, उपप्रचार्य प्रा. डॉ. सय्यद रज्जाक, रजिस्ट्रार दिपक अल्हाट, रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. राजेश टाक, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. सुधिर वाडेकर, प्रोफेसर डॉ. बाळासाहेब गायकर, ग्रंथालय प्रमुख प्रा. डॉ. प्रशांत फुगनर प्रा. डॉ. तूशिता आय्यर, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. भागवत परकाळ उपस्थित होते.
विद्यार्थ्यांशी हितगुज करत असताना जि.पो.अधिक्षक मनोज पाटील यांनी स्वतः स्पर्धा परीक्षेची तयारीसाठी घेलेले कष्ट, इंजिनिअरींग कॉलेज प्राध्यापक ते पोलिस अधिक्षकपदापर्यंतचा जीवनसंघर्ष विद्यार्थ्यांसमोर मांडला, तसेच त्यांचे प्रेरणास्रोत आई व वडील यांनी दिलेली साथ या काळात महत्वपूर्ण होती असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांच्या विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली आणि सरतेशेवटी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडे व्यसनाधीनकडे न वळता विधायक कार्याकडे वळावे असा मानस त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाप्रसंगी प्राणीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. दिलीपकुमार भालसिंग यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. तर सुत्रसंचालन प्रा. डॉ अरहाना ईव्हान तर आभार प्रा. डॉ अविनाश वंजारे यांनी मानले. या कार्यक्रमास तसेच या कार्यक्रमासाठी श्री साई सुरम यांचे विशेष सहकार्य लाभले. प्राणीशास्त्र विभागातील प्रा. डॉ. बलराज खोब्रागडे, प्रा. डॉ. राहुल गायकवाड प्रा. डॉ. गजानन पांडे, प्रा. महेश गोरे, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.
COMMENTS