कान्हूर पठार | नगर सह्याद्री मंगळवार दि. ११ ऑटोबर रोजी न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज, अहमदनगर येथे कॉ. एकनाथराव भागवत स्मृती करंडक राज्यस्...
कान्हूर पठार | नगर सह्याद्री
मंगळवार दि. ११ ऑटोबर रोजी न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज, अहमदनगर येथे कॉ. एकनाथराव भागवत स्मृती करंडक राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा पार पडली. महाराष्ट्रभरातून ९४ कनिष्ठ महाविद्यालयांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेमधून जनता विद्या मंदिर, कान्हूर पठार येथील कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कु.शेळके अनुजा व कु. दुंधव सिद्धी यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
कु.शेळके अनुजा हिने आपल्या भाषणातून कुटुंब संस्थेचे बदलते प्रवाह तर कु. दुंधव सिद्धी हिने माध्यमांचा सामाजिक मूल्यांवरील प्रभाव हा विषय मांडला आणि आपल्या वक्तृत्व शैली व वैचारिक प्रतिभेने परीक्षकांसह प्रेक्षकांची मने जिंकली. या विद्यार्थिनींना सांस्कृतिक विभागाचे प्रमुख सुहास गोरडे, ओमप्रकाश देंडगे यांचे मार्गदर्शन लाभले.
कॉ. एकनाथराव भागवत फिरता स्मृती करंडक, प्रमाणपत्र व पाच हजार रुपये रोख असे स्पर्धेच्या बक्षीसाचे स्वरूप आहे. या दोन्ही विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयात त्यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला. याप्रसंगी फौजी ब्रदर्स प्रतिष्ठान, कान्हूर पठार ग्रामस्थ व विद्यालयाच्या शिक्षकांच्यावतीने त्यांचा सन्मान करून प्रोत्सहानपर काही रोख पारितोषिकेही देण्यात आली.
सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब वमने होते. कार्यक्रमासाठी जाणता राजा प्रतिष्ठानचे किरण ठुबे, हरी व्यवहारे, संतोष भालेकर, गणेश गायखे, डॉ.राजेंद्र ठुबे, सुनील ठुबे, प्रा.तुषार ठुबे हे उपस्थित होते.किरण ठुबे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबर आपल्यामधील विविध कलागुण ओळखून त्यांनाही वेळ द्यावा व विविध स्पर्धांच्या माध्यमातून आपले व्यक्तिमत्त्व घडवावे असे सांगितले. या विद्यार्थिनींचे प्राचार्य बाबासाहेब वमने, पर्यवेक्षक राघू ठाणगे, विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, शालेय व्यवस्थापन समिती, सरपंच, उपसरपंच तसेच सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख सुहास गोरडे यांनी केले तर आभार प्राचार्य वमने यांनी मानले.
COMMENTS