पुणे। नगर सह्याद्री - वाघोली येथील एका सोसायटीत दुर्दैवी घटना घडली. मोझे कॉलेज रस्ता येथील सोलासिया सोसायटीच्या फेज २ मधील एका इमारतीचे ड...
पुणे। नगर सह्याद्री -
वाघोली येथील एका सोसायटीत दुर्दैवी घटना घडली. मोझे कॉलेज रस्ता येथील सोलासिया सोसायटीच्या फेज २ मधील एका इमारतीचे ड्रेनेजचे चेंबर साफ करत असताना ३ सफाई कर्मचार्यांचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ६ च्या सुमारास घडली. घटनास्थळी पीएमआरडीएचे बचाव पथक असून तिघांचे मृतदेह चेंबरच्या बाहेर काढण्यात आले आहे. नितीन प्रभार गोंड (वय ४५), गणेश भालेराव (वय २८, फकीर बाबा वस्ती, नांदेड), सतीशकुमार चुडाहरी (वाघोळी, डोमखेल वय ३५) अशी मृत्यूमुखी पडलेल्या सफाई कर्मचार्यांची नावे आहेत. हे तीन सफाई कर्मचारी ड्रेनेज साफ करण्यासाठी चेंबरमध्ये उतरले होते. चेंबरमधील विषारी वायुमुळे तिघेही बेशुद्ध झाल्यामुळे सोसायटीतील नागरिकांनी पीएमआरडीए अग्निशमन केंद्र आणि पोलिसांना ही माहिती पोलिसांना दिली. त्यांनी तिघांना बाहेर काढले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता.
COMMENTS