मंगेश मुळे । नगर सह्याद्री पारनेर तालुक्यात राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील समजल्या जाणार्या देवीभोयरे गावात खासदार डॉ. सुजय विखे यांची ग...
मंगेश मुळे । नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यात राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील समजल्या जाणार्या देवीभोयरे गावात खासदार डॉ. सुजय विखे यांची गुळ तुला करण्यात आली. देवीभोयरे गावात अंबिकामातेचं अतिशय जागृत देवस्थान असून ते देवस्थान नवसाला पावणारी अंबिकामाता म्हणून जिल्ह्यात परिचित आहे, म्हणून याच पार्श्वभूमीवर विखे पाटील परिवाराचे निष्ठावंत समर्थक सोसायटीचे माजी व्हा. चेअरमन विजय बेलोटे यांनी देवीला सुजय विखे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर देवीला त्यांच्या वजनाची गूळ तुला करेल, असा नवस केला होता.
डॉ. सुजय विखे नगर दक्षिण मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने खासदार झाले. त्या नवसाची परतफेड म्हणून सुजय विखे यांची अंबिकामातेच्या मंदिरात गूळ तुला करण्यात आली. यावरून कार्यकर्त्यांची नेत्याच्या प्रति असलेली भावना अधोरेखित होते. यावेळी खासदार विखे यांचे देवीभोयरे गावात फटाक्यांची आतिषबाजी, वाद्यांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, विश्वनाथ कोरडे, तालुकाध्यक्ष वसंत चेडे, अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष तथा दै. नगर सह्याद्रीचे शिवाजी शिर्के, राहुल पाटील शिंदे, बापुसाहेब भापकर, अरुण ठाणगे, डॉ. अजित लंके, पोपट मोरे, भाजपचे सर्व पदाधिकारी, गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. प्रस्ताविक विश्वनाथ गाजरे यांनी तर आभार विजय बेलोटे यांनी मानले.
COMMENTS