रोटरी इ क्लबच्यावतीने 10 विद्यार्थ्यांना सायकल वाटप पारनेर । नगर सह्याद्री गेल्या अनेक वर्षापासून ग्रामीण व शहरी भागात रोटरी क्लबचे आरोग्य श...
रोटरी इ क्लबच्यावतीने 10 विद्यार्थ्यांना सायकल वाटप
पारनेर । नगर सह्याद्री
गेल्या अनेक वर्षापासून ग्रामीण व शहरी भागात रोटरी क्लबचे आरोग्य शैक्षणिक सामाजिक योगदान मोठे असून आरोग्य क्षेत्रात काम उल्लेखनीय व कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार आमदार नीलेश लंके यांनी काढले आहे.
पारनेर तालुक्यातील आदिवासी पाड्यावरून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेसाठी दूर अंतरावरून यावे लागते. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मी वेळोवेळी सायकलचे वाटप करत असतो. आंतरराष्ट्रीय रोटरी इ क्लब ऑफ एंपॉवरींग युथ यांच्या वतीने पारनेर तालुक्यातील 10 गरजू शालेय मुलींसाठी मोफत सायकल वाटपचे वितरण सोमवारी आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले. रोटरी क्लब सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतो. यावेळी अंतराष्ट्रीय रोटरी इ क्लब ऑफ एंपॉवरींग युथच्या अध्यक्षा नंदिनी जग्गी क्लबच्या संस्थापक डॉ. बिंदु शिरसाठ सचिव सविता चड्ढा, सदस्य जाग्रृती ओबेरॉय शिलू मक्कर यांच्यासह पारनेर नगर पंचायत समितीचे उपाध्यक्षा, नगसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
COMMENTS