’कोहिनूर’तर्फे मानवसेवा प्रकल्पातील निराधार, मनोविकलांगांना दिवाळीनिमित्त भेट अहमदनगर । नगर सह्याद्री दिवाळी सारखा सर्वात मोठा सण लवकरच आपण...
’कोहिनूर’तर्फे मानवसेवा प्रकल्पातील निराधार, मनोविकलांगांना दिवाळीनिमित्त भेट
अहमदनगर । नगर सह्याद्री
दिवाळी सारखा सर्वात मोठा सण लवकरच आपण सगळे साजरा करणार आहोत. करोना महामारीचे मळभ दूर झाल्याने यंदा सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. असे असले तरी समाजात असाही एक वंचित आणि आधाराची गरज असलेला घटक आहे. त्यांना आपण मदतीचा हात, आपुलकी दिली पाहिजे. कोहिनूर परिवाराने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. मानवसेवा प्रकल्पातील निराधार, मनोविकलांगांना दिवाळीचा आनंद मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे, असं प्रतिपादन अश्विन गांधी यांनी केले.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोहिनूर वस्त्रदालनातर्फे अरणगाव सोनेवाडी शिवारातील श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पातील निराधार मनोविकलांगांना कुर्ता पायजमा देण्यात आले. यावेळी श्रीमती निताभाभी गांधी उपस्थित होत्या.मानवसेवा प्रकल्पात निराधार असलेल्या व्यक्तींना मायेचा आधार देत सांभाळले जाते. मनोविकारावर उपचार करून अनेकांना त्यांच्या आप्तस्वकियांकडे सोपविण्यात येते.
COMMENTS