किसान महाविद्यालयाचे स्वच्छता अभियान पारनेर । नगर सह्याद्री सध्या स्वच्छतेचा प्रश्न हा आरोग्याची निगडित असून महाविद्यालयीन शिक्षण घेत असतान...
किसान महाविद्यालयाचे स्वच्छता अभियान
पारनेर । नगर सह्याद्री
सध्या स्वच्छतेचा प्रश्न हा आरोग्याची निगडित असून महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी गावचे कुटुंबाचे स्वच्छता दुत बनावे असे आवाहन माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे यांनी केले आहे. तर आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी स्वच्छतेकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. स्वच्छता हीच आरोग्याची गुरूकिल्ली असल्याचे पारनेर नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष तथा किसान बहुउददेशिय संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चेडे यांनी सांगितले.
किसान कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत पारनेर बसस्थानक, पंचायत समिती तसेच तहसिल कार्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्याचे चेडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी जितेंद्र दळवी, शिक्षक राठोड, धात्रक, हराळ, सोमवंशी, शिक्षिका बेंद्रे आदी यावेळी उपस्थित होते.
चेडे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियान उपक्रमाबद्दल आभार मानले. यावेळी बोलताना त्यांनी स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. ते म्हणाले, परिसराचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. त्यासाठी परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. स्वच्छतेबरोबरच योग्य व पुरेसा आहार, शुध्द पाणी, मुलांचे योग्य वेळी लसीकरण केले तर बरेचसे आजार उद्भवतच नाहीत. वयक्तीक स्वच्छतेबरोबरच परिसर स्वच्छतेलाही महत्व आहे. आपले घर, घराचा परिसर स्वच्छ ठेवले तरच आपल्या गावाचे व आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते 60 टक्के आजार किंवा रोग सुरक्षित, शुध्द पिण्याचे पाण्याच्या व योग्य परिसर स्वच्छतेच्या अभावामुळे होतात. विशेषतः कुपोषित बालकांवर अशुध्द पाणी, प्रदुषित परिसराचा प्रतिकूल परिणाम होतो.पिण्याच्या पाण्याचा स्वच्छ पुरवठा, सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता, मानी मलमुत्रांची विल्हेवाट, पाळीव प्राण्यांची देखभाल, घरातील स्वच्छता, शेण व कचर्याची विल्हेवाट, सांडपाण्याची विल्हेवाट या सर्व गोष्टींचा विचार करून उपाययोजना केल्या पाहिजेत, असे ते म्हणाले.
COMMENTS