अहमदनगर । नगर सह्याद्री आज मनुष्य भौतिक गोष्टींला सुख समजू लागला आहे, परंतु मनुष्याला मन:शांती काय लाभत नाही, त्यावर आध्यात्म हा पर्याय आहे....
अहमदनगर । नगर सह्याद्री
आज मनुष्य भौतिक गोष्टींला सुख समजू लागला आहे, परंतु मनुष्याला मन:शांती काय लाभत नाही, त्यावर आध्यात्म हा पर्याय आहे. अनेक प्रश्नांची उत्तरे ही आध्यात्म्यात मिळतात. त्यामुळे प्रत्येकाने भगवंतांचे नामस्मरण केले पाहिजे. धार्मिक उत्सवातून एक प्रेरणा आणि चैतन्य मिळत असते. जीवनाला ऊर्जा देण्याचे काम यातून होत असते. त्यासाठी आशा कार्यक्रमांची गरज आहे. त्यातून सामाजिक संदेश दिल्यास समाज जागृत होईल. हेच कार्य श्री साईबाबा मंदिराच्यावतीने होत आहे. दरवर्षी सप्ताहांतर्गत होणार्या उपक्रमातून परिसरातील नागरिकांना भगवंतांच्या सेवा करण्याची संधी उपलब्ध होत आहे, असे प्रतिपादन हभप. जंगले महाराज शास्त्री यांनी केले.
नालेगाव, वाघगल्ली येथील श्री साईबाबा मंदिराच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित किर्तन सप्ताहाच्या समारोपप्रसंगी हभप जंगले महाराज शास्त्री यांचे काल्याचे किर्तन झाले. याप्रसंगी त्यांचा मंदिराच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे, शहरप्रमुख संभाजी कदम, आयोजक नगरसेवक गणेश कवडे, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, नगरसेवक सचिन शिंदे, दत्ता जाधव, संतोष गेनप्पा, पारुनाथ ढोकळे, मनुवीर आगरवाल आदि उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक गणेश कवडे म्हणाले, गेल्या 20 वर्षांपासून मंदिराचा वर्धापन दिन दरवर्षी उत्साहात साजरा करत असतो. यंदा तीन दिवसीय किर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. प्रभागातील विविध विकास कामांबरोबरच धार्मिक, सामाजिक कार्यास नेहमीच प्राधान्य दिले आहे. साईबाबा मंदिराच्या माध्यमातून धार्मिकता वाढीस लागावी यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येत असतात. या सप्ताहात परिसरातील नागरिकांचा सहभाग हा प्रेराणादायी असल्याचे सांगितले. या सप्ताहाच्या पहिल्या दिवशी शहरातून साईबाबांची पालखी मिरवणुक काढण्यात आली. हभप ज्ञानेश्वर महाराज तांबे, महेश महाराज हरवणे आदिंंची किर्तने झाली. तीन दिवस संत नामदेव भजनी मंडळ व दुर्गा भजनी मंडळाने भजन सादर केले. या सर्व कार्यक्रमात परिसरातील नागरिकांनी उत्स्फुर्त सहभागी झाले होते. यावेळी महापौरांच्या हस्ते साईबाबांची आरती करण्यात आली. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सप्ताह यशस्वीतेसाठी प्रभाकर वाघमारे, पै.मन्नी शिंदे, रघुनाथ लांडे, राम कराळे, दिपक चत्तर, दिनेश वाघमारे, गणेश गायकवाड, अमर शिंदे, योगेश वाघमारे, अश्विन दुर्गुळे, सोमनाथ मारवाडे, भैय्या वाघमारे आदिंसह साई प्रतिष्ठान, कारंजा तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
COMMENTS