अहमदनगर । नगर सह्याद्री अहमदनगर शहरातील नामांकित अल्पसंख्यांक संस्था अंजुमन तरक्की ए. उर्दूच्या चेअरमनपदाचा नजीर अहमद ऊर्फ नज्जू पैलवान यांन...
अहमदनगर । नगर सह्याद्री
अहमदनगर शहरातील नामांकित अल्पसंख्यांक संस्था अंजुमन तरक्की ए. उर्दूच्या चेअरमनपदाचा नजीर अहमद ऊर्फ नज्जू पैलवान यांनी स्वखुशीने राजीनामा दिला. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. या संस्थेच्या चेअरमनपदी उच्चशिक्षित आर्किटेक्टस् शेख अर्शद महबूब यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मावळते चेअरमन नजीर अहमद उर्फ नज्जू पैलवान यांनी त्यांचे स्वागत करत त्यांच्याकडे पदाची सूत्रे सुपूर्द केली.
यावेळी मौलाना इरशादुल्ला, संस्थेचे उपाध्यक्ष शेख मुजाहिद माजीद, सचिव सय्यद अन्सार महंमद इस्माईल, सहसचिव शेख हनीफ मेहबूब व शेख अतीक रशीद, खजिनदार सय्यद छाबामियाँ अन्वरमियाँ, विश्वस्त शेख वाजीद नजीर अहमद, सय्यद जिया ख्वाजा, ड. शेख हफिज नूरमोहंमद जहागिरदार, डॉ. शेख सुल्तान दुलेखाँ, डॉ. इक्राम अहमद मुनीर खान, सय्यद नदीम अन्वर, हाजी शेख मन्सूर हाजी अ. अजीज, शेख सलीम शफिक, शेख इम्तियाज उस्मानमियाँ आदींसह मान्यवर उपस्थित होते.
नजीर अहमद ऊर्फ नज्जू पैलवान यांनी सुमारे 24 वर्षे चेअरमनपद भूषवले. या काळात त्यांनी संस्थेला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यांनी महापालिकेच्या माणिक चौक येथील आदर्श शाळेत चाँद सुलताना प्राथमिक शाखा सुरू केली. संस्थेला हातमपुरा येथील मनपाची 1 नंबर शाळा मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मुकुंदनगर भागातील मेराज मस्जिदजवळ ओपन स्पेस शाळेसाठी मिळवून देण्याकामी प्रयत्न केले. कोल्हार भगवतीपूर येथे माध्यमिक शाळा सुरू केली. शाळेत 1 हजार 500 पेक्षा अधिक विद्यार्थी असून, प्राथमिक शाळेत 600 विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. यावेळी संस्थेच्या वतीने माजी चेअरमन नजीर अहमद ऊर्फ नज्जू पैलवान आणि नूतन चेअरमन शेख अर्शद महबूब यांचा सत्कार करण्यात आला.
COMMENTS