निमित्त आहे वसू बारसेच्या दीपोत्सवाचे मुंबई | वृत्तसंस्था राज्यात अडीच वर्षांपूर्वा महाविकास आघाडीच्या निमित्ताने नवे राजकीय समीकरण पहायला म...
निमित्त आहे वसू बारसेच्या दीपोत्सवाचे
मुंबई | वृत्तसंस्थाराज्यात अडीच वर्षांपूर्वा महाविकास आघाडीच्या निमित्ताने नवे राजकीय समीकरण पहायला मिळाले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले आणि आणखी एक नवा राजकीय प्रयोग पहायला मिळाला. आता राज ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाढणारी जवळीक पाहता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच हे तिन्ही नेते शुक्रवारी पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. एमसीए निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार, शिंदे आणि फडणवीस नुकतेच एकत्र आले होते.
शुक्रवारी दिवाळीचा पहिला दिवस वसूबारसनिमित्त मनसेने शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सवाचे आयोजन केले असून यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दीपोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे त्रिकूट एकत्र दिसणार आहे. गणेशोत्सवात एकनाथ शिंदे शिवतीर्थवर पोहोचले होते.
अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राज ठाकरे यांनीफडणवीस यांना पत्र लिहिले होते. दीपोत्सवानिमित्त एकत्र येणारे हे त्रिकूट भविष्यात राज्याच्या राजकारणातही एकत्र दिसणार का? हे पहावे लागेल.
COMMENTS