अहमदनगर | नगर सह्याद्री नगरमधील बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई संघटनेच्या अहमदनगर शाखेने चार वर्षांच्या कालावधीनंतर क्रेडाई मेगा प्रॉपर्टी...
अहमदनगर | नगर सह्याद्री
नगरमधील बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई संघटनेच्या अहमदनगर शाखेने चार वर्षांच्या कालावधीनंतर क्रेडाई मेगा प्रॉपर्टी एस्पो २०२२ प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दि. १४ ते १६ ऑटोबर दरम्यान सदर प्रदर्शन होणार आहे. तीन दिवसांचे हे रिअल इस्टेट प्रदर्शन सावेडी रस्त्यावरील सारडा महाविद्यालयाच्या प्रशस्त अशा ३ एकर जागेत होणार आहे.
प्रदर्शनात रेरा कायद्याअंतर्गत नोंदणी झालेले तसेच बांधकामाचे भोगवटा प्रमाणपत्र दाखला मिळालेले १२० हून अधिक प्रकल्प सादर करण्यात येणार आहेत. ८० हून अधिक स्टॉल्स यात असणार असून प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. या प्रदर्शनाला भेट देणार्यांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधीही देण्यात आली आहे. दररोज एक लकी ड्रॉ काढून विजेत्यास आकर्षक बक्षिस दिले जाणार आहे. याशिवाय प्रदर्शनात मनोजरंजन कार्यक्रमांचीही रेलचेल असणार आहे. सदर प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक स्टेट बँक ऑफ इंडिया असुन, प्लॅटीनम स्पॉन्सर महावीर ग्रुप व आयकॉन स्टील तर गोल्ड स्पॉन्सर कोहिनूर मॉल व राघवेंद्र सप्लायर्स प्रा.लि. आहेत, अशी माहिती क्रेडाई अहमदनगरचे चेअरमन अमित मुथा यांनी दिली.
कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया ही भारतातील बांधकाम व्यावसायिक व डेव्हलपर्सची अतिशय प्रतिष्ठित व विश्वसनीय संस्था आहे. क्रेडाईचे सदस्यत्त्व देतानाच नियमांचे काटेकोर पालन केले जाते. त्यामुळे ग्राहकांचाही क्रेडाई सदस्य असलेल्या बांधकाम फर्मकडूनच घर खरेदी करण्याकडे कल असतो. क्रेडाईची ची विश्वसनीयता जपत अहमदनगर शाखेने आपल्या सदस्यांचे सर्व रजिस्टर्ड प्रोजेटस् एकाच छताखाली ग्राहकांना उपलब्ध व्हावेत यासाठी या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. कोविड काळामुळे दोन वर्षे या प्रदर्शनाच्या परंपरेत खंड पडला होता. आता कोविड नंतर सर्वत्र अर्थकारणाला चालना मिळत आहे. दिवाळीसारख्या मोठा सण साजरा होणार आहे. अशा काळात हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती करता यावी यासाठी क्रेडाईने पुढाकार घेतल्याचे सेक्रेटरी अमित वाघमारे यांनी सांगितले.
प्रत्येक स्टॉल प्रशस्त व अत्याधुनिक सोयी सुविधांसह सुसज्ज असल्याने ग्राहकांना अतिशय निवांत वातावरणात आपल्या स्वप्नातील घराची निवड करता येणार आहे. प्रदर्शनस्थळी बँका, गृह कर्ज देणार्या फायनान्स कंपन्यांचे स्टॉल्सही असणार आहेत. परवडणारी बजेट होम, लझुरियस घरे, व्टिन बंगलो, अपार्टमेंट, अंतिम मंजुरीचे प्लॉटेड ले आऊट, कमिर्शियल कॉम्प्लेसचे प्राजेट, फार्म हाऊस, एन.ए. प्लॉट एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. ७.५० लाखापासून ते २.५० कोटींपर्यंतची घरे, फ्लॅटचे प्रोजेट याठिकाणी असणार आहे.
COMMENTS