डॉ. संतोष खेडलेकर यांच्या पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संगमनेर । नगर सह्याद्री वाट चालताना या पुस्तकात संतोष खेडलेकर यांनी उत्तमचंदजी सर...
डॉ. संतोष खेडलेकर यांच्या पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा
संगमनेर । नगर सह्याद्री
वाट चालताना या पुस्तकात संतोष खेडलेकर यांनी उत्तमचंदजी सरनोत यांचे केलेले व्यक्तिचित्रण म्हणजे एका खर्याखुर्या कर्मयोगी व्यक्तिमत्वाच्या आयुष्याचा पट आहे त्यामुळे हे पुस्तक समाजाला दिशादर्शक ठरेल असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि गीता परिवाराचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी केले. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. संतोष खेडलेकर यांनी लिहिलेल्या वाट चालतानाफ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर उपस्थित होत्या.
लोणी (ता. राहाता) येथील उत्तमचंद सरनोत यांच्या आयुष्यावर आधारित वाट चालताना हे चरित्रात्मक पुस्तक डॉ. खेडलेकर यांनी नुकतेच लिहिले. एका व्यापारी माणसाच्या आयुष्यातील खडतर संघर्ष टिपताना त्यांनी प्रामाणिकपणा, सचोटी, ग्राहकाभिमुखता या त्रिसूत्रीच्या आधारे मिळवलेले यश अधोरेखित करणार्या या पुस्तकचा प्रकाशन सोहळा नुकताच येथील मालपाणी क्लब आणि रिसोर्ट मध्ये झाला. याप्रसंगी बोलताना शालिनी विखे यांनी सरनोत आणि विखे परिवाराच्या तीन पिढ्यांच्या ऋणानुबंधाच्या आठवणींना उजाळा दिला. पुस्तकाचे लेखक डॉ. खेडलेकर यांनी पुस्तकाच्या लेखनामागील भूमिका आपल्या मनोगतातून मंडळी. याच कार्यक्रमात पुस्तकाचे चरित्रनायाक उत्तमचंदजी यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सरनोत परिवारातील ज्येष्ठ सदस्य रतनचंदजी सरनोत हेही व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अनुश्री खैरे यांनी केले. प्रास्तविक सुनीता सरनोत यांनी केले तर डॉ. महावीर सरनोत यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राजकुमार गांधी, संजय सरनोत आदींनी विशेष परिश्रम घेतले.
COMMENTS