राष्ट्रीय स्पर्धेसाठी दुसर्यांदा निवड / केंद्रीय विद्यालय रिजनल तायक्वांदोत सुवर्ण तर राष्ट्रीय तायक्वांदोत कांस्य पदक अहमदनगर / नगर सह्याद...
राष्ट्रीय स्पर्धेसाठी दुसर्यांदा निवड / केंद्रीय विद्यालय रिजनल तायक्वांदोत सुवर्ण तर राष्ट्रीय तायक्वांदोत कांस्य पदक
अहमदनगर / नगर सह्याद्री -
केंद्रिय विदयालय संगठन आयोजित रिजनल तायक्वांदो स्पर्धेत केडगाव येथील खेळाडू विराज गजेंद्र पिसाळ याने सुवर्णपदक पटकाविले. तर केंद्रीय विद्यालय नॅशनल तायक्वांदो स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली.
गोवा येथे रिजनल तायक्वांदो स्पर्धेत पिसाळ याने 14 वर्ष वयोगटाखालील 38 ते 41 या वजन गटामध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन विजेतेपद पटकाविले होते. त्यानंतर राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होऊन आग्रा (उत्तरप्रदेश) येथे पार पडलेल्या 51 व्या केंद्रिय विद्यालय राष्ट्रीय तायक्वांदो क्रिडा स्पर्धेत त्याने कांस्य पदक मिळवले. तसेच तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांनी नाशिक येथे आयोजित केलेल्या स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक मिळवले आहे. पुढील महिन्यात दिल्ली येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याची दुसर्यांदा निवड झाली आहे.
विराज पिसाळ हा शहरातील केंद्रिय विद्यालय क्रमांक 1 चा विद्यार्थी आहे. जेष्ठ विधिज्ञ गजेंद्र दशरथ पिसाळ व रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाच्या उपशिक्षिका स्मिता गजेंद्र पिसाळ यांचा मुलगा असून, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास शंकरराव पिसाळ यांचा तो नातू आहे. विराज हा एकलव्य तायक्वांदो असोसिएशन भूषणनगर, केडगांव येथे प्रशिक्षिक गणेश वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. तसेच त्याला केंद्रिय विद्यालयाचे क्रिडा शिक्षक परदेशी सर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. विराजचा लहान भाऊ क्षितिज पिसाळ हा देखील उत्कृष्ट तायक्वांदो खेळाडू असून, राज्य स्पर्धेत त्याने कांस्य पदक पटकाविले आहे. या यशाबद्दल केंद्रिय विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य, तसेच एकलव्य तायक्वांदो असोसिएशनचे खेळाडू व प्रशिक्षक यांनी विराज याचे अभिनंदन केले आहे.
COMMENTS