अहमदनगर | नगर सह्याद्री स्टील देतो, असे सांगून विश्वास संपादन करत एका व्यावसायिकाची सहा लाखांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार ४ व ५ ऑ...
अहमदनगर | नगर सह्याद्री
स्टील देतो, असे सांगून विश्वास संपादन करत एका व्यावसायिकाची सहा लाखांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार ४ व ५ ऑटोबरला घडला. या प्रकरणी घारगाव (ता. श्रीगोंदा) येथील व्यावसायिकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीवरून अमित मिश्रा गोयल नामक व्यक्तीविरूद्ध येथील कलम ४२० सह आयटी अॅट कलम ६६ (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घारगाव येथील फिर्यादी यांचे सिमेंट व स्टीलचे दुकान आहे. ते नेहमी विक्रीसाठी सिमेंट व स्टील खरेदी करतात. ४ व ५ ऑटोबरला त्यांना एका मोबाईल नंबरवरून फोन आला. समोरच्या व्यक्तीने स्टील प्रायव्हेट लिमिटेड, रायपूर येथून सेल्समन अमित मिश्रा गोयल बोलतो, असे सांगितले. स्टील देतो असे सांगून एका व्हॉट्सअॅप नंबरवरून फिर्यादीला खोटी कागदपत्रे पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला. स्टील खरेदीसाठी फिर्यादी यांनी त्या व्यक्तीच्या बँक खात्यावर सहा लाख रूपये पाठविले. त्या व्यक्तीने फिर्यादी यांना स्टील दिले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने सायबर पोलिसांत गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले करीत आहेत.
COMMENTS