सरपंच लिलाताई रोहोकले, उपसरपंच संदीप ठुबे यांची माहिती पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील भाळवणी येथील गावठाण व उर्वरीत वाड्या वस्त्यां...
सरपंच लिलाताई रोहोकले, उपसरपंच संदीप ठुबे यांची माहिती
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुयातील भाळवणी येथील गावठाण व उर्वरीत वाड्या वस्त्यांवर पाणीपुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच या कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती सरपंच लिलाताई रोहोकले, उपसरपंच संदिप ठुबे यांनी दिली.
या नव्या योजनेत ५० हजार व ४५ हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे .येत्या तीन महिन्यात या नवीन योजनेची काम पूर्ण होणार आहे. या योजनेमुळे भाळवणी व वाड्या वस्त्यांवरील पिण्याच्या पाण्याची दुर्भिष्य कायमस्वरूपीचे हटणार आहे शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास रोहोकले यांनी या कामी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. रोहोकले यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून भाळवणीच्या पिण्याच्या पाणीपुरवठाबरोबर आमली येथील दहा लाख रुपयांच्या साठा बंधारा तसेच भाळवणी गावातील गाव तलावाच्या दुरुस्तीसाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्यांनी दिली. पिण्याच्या पाण्याबाबत दुर्भिक्ष्य असणारे भाळवणी हे गाव होते. मात्र सन २००९ साली भारत निर्माण योजने अंतर्गत भाळवणीला काळु धरणातून १४ किलोमीटरची पाणीपुरवठा योजना झाली तेंव्हापासून दुष्काळाचे तीन वर्ष वगळता भाळवणीला सतत पूर्ण दाबाने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. दुष्काळी परिस्थितीतही बोअरवेलच्या माध्यमातून गावाला पाणीपुरवठा सुरूच होता. यामुळे टँकरची आवश्यकता भासली नाही.
भाळवणी गावठाणाबरोबरच वाडी वस्तीवरही पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. उर्वरित नागबेंदवाडी, पांदाडवाडी,लकडे मळा, १० वा मैल, येथील उर्वरीत पिण्याच्या पाण्याच्या १४ किलोमीटरच्या पाणी योजनेत पाणीपुरवठा विभागाची मंजुरी मिळाली असून आता भाळवणीसह वाडीवस्तीला पूर्ण दाबाने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार आहे. यासाठी १ कोटी ९९ लाख ७३ हजार ६४५ रुपयांच्या कामाला निधी प्राप्त झाला असून या कामाचे कार्यारंभ आदेशही निघाले आहेत.
COMMENTS