न्याय न मिळाल्यास आरपीआयच्यावतीने ठिय्या आंदोलनाचा इशारा अहमदनगर । नगर सह्याद्री अहमदनगर शहरातील सावेडी उपनगर भागात नवरात्र उत्सव काळात गुलम...
न्याय न मिळाल्यास आरपीआयच्यावतीने ठिय्या आंदोलनाचा इशारा
अहमदनगर । नगर सह्याद्री
अहमदनगर शहरातील सावेडी उपनगर भागात नवरात्र उत्सव काळात गुलमोहर रोड परिसरात असलेल्या नवरात्रीच्या मंडळाच्या मांडवाला त्या ठिकाणी खेळत असलेल्या बालकाने हात लावला. त्या 12 वर्षीय रोहित धनंजय जगधने नामक बालकाचा विजेचा शॉक लागून जागेवरच मृत्यू झाला. त्यानंतर या बालकाचे जिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आले.
सदरची घटना ही इतकी गंभीर होती की, या ठिकाणी पाहणी केली असता मोरया युवा प्रतिष्ठानचे मंडळाचे अध्यक्ष अर्जुन मदान यांनी चोरून विजेचे कनेक्शन घेतले होते. त्यांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाला आहे. सदर घटना तोफखाना पोलिसांना निदर्शनास आणून देखील मंडळाचे अध्यक्ष मदान यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे लवकरात - लवकर मंडळाच्या अध्यक्षांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने व पीडित कुटुंबियाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांना निवेदन देऊन करण्यात आली.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष शशिकांत पाटील, युवकचे जिल्हाध्यक्ष अमित काळे, महिला जिल्हाध्यक्ष जया गायकवाड, नाना पाटोळे, प्रवीणा घैसास, दया गजभिये, गौतम कांबळे, निखिल सूर्यवंशी, महादेव भिंगारदिवे, जॉन गायकवाड, प्रवीण वाघमारे, विनोद भिंगारदिवे, रोहित कांबळे, कृष्णा भिंगारदिवे, अनिरुद्ध घैसास, अनिशा जगधने, धनंजय जगधने, अनिता जगधने, सुशीला जगधने, अजय पाटोळे, बबईताई डाके, अजय बोरुडे आदीसह पीडित कुटुंब उपस्थित होते. तसेच लवकरात लवकर मंडळाच्या अध्यक्षांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
COMMENTS