मुंबई । नगर सह्याद्री - एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केरळच्या कोझीकोडमध्ये एका 30 वर्षीय महिलेच्या पोटातून डॉक्टरांनी फोरसेप अ...
मुंबई । नगर सह्याद्री -
एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केरळच्या कोझीकोडमध्ये एका 30 वर्षीय महिलेच्या पोटातून डॉक्टरांनी फोरसेप अर्थात कैचीसारखे एक उपकरण बाहेर काढले आहे. या उपकरणाचा वापर ऑपरेशनवेळी व्हेसल्स (रक्तवाहिन्या) पकडण्यासाठी केला जातो. हर्षिनाच्या पोटात हा फोरसेप 2017 पासून होता. डॉक्टर तिच्या सीजेरियनवेळी ते तिच्या पोटात विसरले होते.
मागील 5 वर्षांपासून हर्षिना हेवी अँटीबायोटिक्सच्या मदतीने वेदना सहन करत होती. गत 17 सप्टेंबर रोजी कोझीकोड वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून हे फोरसेप बाहेर काढले आहे.
हर्षिनाचे 2017 मध्ये कोझीकोड वैद्यकीय महाविद्यालयात तिसरे सीजेरियन झाले होते. त्यापूर्वीचे 2 सीजेरियन खासगी रुग्णालयात झाले आहे. तिच्या माहितीनुसार, तिसऱ्या शस्त्रक्रियेनंतर तिच्या पोटात तीव्र वेदना होत होत्या. हे सीजेरियनमुळे होत असल्याचे मला वाटले. मी अनेक डॉक्टरांना दाखवले. वेदना सहन करण्यापलिकडे गेल्या होत्या. फोरसेप माझ्या यूरिनरी ब्लॅडरवर दबाव टाकत होते. यामुळे संसर्गही होत होता.
कोझीकोड वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी 5 वर्षांनंतर ऑपरेशन करून फोरसेप बाहेर काढले. हर्षिनाने या प्रकरणी डॉक्टरांविरोधात 5 वर्षांपूर्वी सर्जरी करताना फोरसेप पोटात विसरल्याची तक्रार दाखल केली आहे आहे.
हे प्रकरण उजेडात येताच आरोग्य मंत्री वीना जॉर्ज यांनी शनिवारी हर्षिनाच्या तक्रारीनुसार कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. तसेच आरोग्य सचिवांना यासंबंधीचा अहवाल तातडीने सादर करण्याचेही निर्देश दिले आहे. वीना यांनी एका निवेदनात या प्रकरणी जबाबदार लोकांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. कोझीकोड वैद्यकीय महाविद्यालयानेही या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे.
COMMENTS