सुपा स्टेट बँकेकडून शहिद रामचंद्र साठेंच्या वारसांना चौदा लाखाची पाॅलिसी रक्कम आदा सुपा । नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील लोणी हवेली येथी...
सुपा स्टेट बँकेकडून शहिद रामचंद्र साठेंच्या वारसांना चौदा लाखाची पाॅलिसी रक्कम आदा
सुपा । नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील लोणी हवेली येथील शहीद जवान रामचंद्र साठे यांच्या कुटुंबाला सरकारी जमिनी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असुन भविष्यात या परिवाराच्या पाठीशी ठाम पणे उभे रहाणार आहे असे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले.
पारनेर तालुक्यातील लोणी हवेली येथील शाहिद जवान कै. रामचंद्र लहू साठे यांच्या वारसांना विर पत्नीला विमा पाँलिसीचा चौदा लाखाचा धनादेश आमदार निलेश लंके यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
शहिद रामचंद्र साठे हे १०-७-२०२२ रोजी जम्मु काश्मीर मधील आकनुर स्केंटर मध्ये देश सेवा करत आसताना शत्रूशी लढताना शहिद झाले होते. त्याअगोदर त्यांनी सुपा स्टेट बँकेत वार्षिक पन्नास हजार रुपये हप्ताची पाच हप्त्यातील पाँलीसी घेतली होती. त्यात त्यांनी दोन हप्ते भरले होते व दुर्दैवाने ते देश सेवा करत आसताना शहिद झाले. या घटनेची नोंद व माहिती स्टेट बँकेच्या सुपा शाखेत कळाली तेंव्हा तेथील शाखा व्यावस्थापक अमर ज्योती यांनी वरीष्टांच्या सल्याने साठे परिवाराचा क्लेम पुर्ण करण्यासाठी वेगवान हालचाली केल्या. यात या परिवाराचे उरउरीत हाप्ते बाँकेने भरले व या परिवाराला संपुर्ण संरक्षण देत सुमारे चौदा लाखांची नुकसान भरपाई विमा पास केला तसेच या शहिद जवानाचा मुलगा चि. समर्थ रामचंद्र साठे (आडीच वर्षे ) हा जेव्हा आठरा वर्षाचा होईल तेंव्हा त्याला पाँलिसी प्रमाणे आठ लाख रुपये मिळतील अशी तरतुद केली आहे. अशी माहिती अमर ज्योती यांनी दिली.
पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थित बँक अधिकार्यांनी शहिद जवान साठे परिवाराला चौदा लाखांचा धनादेश दिला यावेळी वीर पत्नी कल्याणी रामचंद्र साठे, वीर पीता वडील लहू चांगदेव साठे, आई वीरमाता सौ. शोभा लहू साठे, मुलगा समर्थ रामचंद्र साठे ( आडीच वर्षे ) व सहा महिन्यांची मुलगी समिक्षा रामचंद्र साठे हा साठे परिवार उपस्थित होता. यावेळी ही लहान बाळे पाहुन अनेकांना गहिवरुन आले. कार्यक्रमाला सुपा परिसरातील अनेक गावातुन आजी माजी सौनिक, लोणी हवेलीचे ग्रामस्थ व सुपा परिसरातील सरपंच,उपसरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.
शहिद साठे परिवाराला त्याच्या हक्काची आवश्यक ती मदत मिळवून देण्यात बँक शाखा आधिकारी अमर ज्योती, सदीप सरोवरे, दिनेश सिंग, आर्ची जमुवार, आमृता गर्जे, पिंताबर थिटे, दत्ता पारदे, आप्पा कोल्हे यांनी मोठे साहाय्य केले.
जवान आपले बलिदान देऊन देशाची सेवा करतात व आपल्याला सुरक्षित ठेवतात यात त्यांच्या परिवार खुप मोठा त्याग करतो. कधीकधी आपले सर्वस्व गमावतो अशा वेळी आपण सर्वांनी या परिवाराच्या पाठिशी खंबीर उभे रहाणे हे आपले कर्तव्य आहे, आज या परिवाराचा आम्हाला अभिमान आहे आम्ही यांची सेवा करत आहोत ज्यांनी देश सेवेत आपले अनमोल रत्न गमवले आहे.
- अमर ज्योती, शाखा अधिकारी स्टेट बँक ऑफ इंडिया सुपा.
COMMENTS