पारनेर । नगर सह्याद्री पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रविवारी झालेल्या लिलावात प्रति किलो चांगल्या प्रतीच्या कांद्याला 31 रुप...
पारनेर । नगर सह्याद्री
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रविवारी झालेल्या लिलावात प्रति किलो चांगल्या प्रतीच्या कांद्याला 31 रुपये किलो भाव मिळाला असल्याची माहिती सभापती प्रशांत गायकवाड व उपसभापती विलास झावरे यांनी दिली आहे. गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून कांद्याला सरासरी 15 ते 20 रूपयांपर्यत भाव स्थिर होते परंतु या भाववाढीमुळे पारनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात रविवारी 16 ऑक्टोबर रोजी झालेल्या कांदयाच्या लिलावात 28 हजार 497 गोण्यांची आवक झाली असल्याची माहिती सचिव शिवाजी पानसरे यांनी दिली आहे.
गेल्या महिनाभरात पारनेर तालुक्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असून बाजार समितीत 31 रूपये कांद्याला उच्चांकी भाव मिळाल्याने शेतकरी वर्गाला थोडासा दिलासा मिळणार असून कांद्याच्या भावात वाढ झाल्याने शेतकरांची दिवाळी गोड होणार आहे. पारनेर बाजार समितीच्या आवारा्कांदा लिलाव आठवड्यातील 3 दिवस चालू राहील. यावेळी 1 ते 2 प्रतिच्या कांद्याला प्रतिक्विंटल 3000 ते 3100 रुपये बाजारभाव मिळाला तर 2 नंबरला 1300 ते 2100 तर 3 नंबरला 300 ते 1200 रुपये प्रतिक्विंटल इतका मिळाला. आठवडयातून दर रविवारी, बुधवारी व शुक्रवारी कांदा लिलाव होत असतात. शेतकर्यांनी आपली फसवणुक टाळण्यासाठी बाजार समितीतच कांद्याची विक्री करावी असे आवाहन संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.त्यामुळे शेतकर्यांनी शेतावर कांदा विक्री करताना शेतकर्यांनी फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यामुळे बाजार समिती मध्ये कांदा चांगला प्रतीमध्ये निवडुन कांदा बाजार समिती मध्ये विकावा अशी विनंती बाजार समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
COMMENTS