शेठ दामोदर मालपाणी उद्योग समूह सेवक पतसंस्थेची सभा खेळीमेळीत संगमनेर | नगर सह्याद्री स्वर्गीय ओंकारनाथ व माधवलाल मालपाणी यांनी कर्मचारी व का...
शेठ दामोदर मालपाणी उद्योग समूह सेवक पतसंस्थेची सभा खेळीमेळीत
संगमनेर | नगर सह्याद्री
स्वर्गीय ओंकारनाथ व माधवलाल मालपाणी यांनी कर्मचारी व कामगारांच्या आर्थिक स्थैर्यासाठी चार दशकांपूर्वी पतसंस्थेची संकल्पना मांडली. त्यातून शेठ दामोदर मालपाणी सेवक पतसंस्थेची स्थापना झाली. गेल्या ४१ वर्षांच्या प्रवासात या संस्थेने सभासदांच्या जीवनात आनंद फुलवण्याचा प्रयत्न केला आहे. संस्थेच्या आजवरच्या संचालकांनी स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराची परंपरा अखंडपणे जोपासल्याने संस्थेने नेत्रदीपक प्रगती केल्याचे प्रतिपादन उद्योजक गिरिश मालपाणी यांनी केले.
शेठ दामोदर मालपाणी उद्योग समूह सेवक पतसंस्थेच्या ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी संस्थेचे चेअरमन विशाल वाजपेयी, व्हा.चेअरमन चंद्रकांत गोडसे, सेक्रेटरी संजय वाकचौरे, प्रमुख मार्गदर्शक ओंकार तिवारी यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य व सभासद उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना मालपाणी म्हणाले की, संस्थेचा कारभार एकदिलाने सुरु असल्याने संस्थेद्वारा विविध कल्याणकारी योजना राबविल्या गल्या आहेत. अडचणीच्या काळात सभासदांना शाश्वत मदतीचा हात मिळाल्याने त्यांच्या जीवनाला आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे. मुलांचे उच्चशिक्षण, पारिवारिक आरोग्य अथवा घर बांधणीसाठी संस्थचीे भक्कम साथ मिळाल्याने सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सर्वांना सोबत घेवून सहकारातून समृद्धीच्या दिशेने सुरु असलेला संस्थेचा प्रवास खूप उज्ज्वल असल्याचाही आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
संस्थेचे सेक्रेटरी संजय वाकचत्तेरे यांनी अहवालाचे वाचन केले. चेअरमन विशाल वाजपेयी यांनी सभासदांनी उपस्थित केलेल्या विविध शंकांचे व प्रश्नांचे निरसन केले. ओंकार तिवारी, रमेश घोलप, देवदत्त सोमवंशी, प्रदीप कानवडे, राजेश दुबे, युनिक फौंडेशनचे चेअरमन नितीन डागा, अशोक सावंत, नारायण काळे, भेट निधीचे अध्यक्ष रवींद्र कानडे, डॉ.पराग सराफ, रमेश सिनारे, उदय खैरनार, बाळासाहेब हासे, गणेश विसपुते, प्रकाश शेराल, निलेश बाहेती, मनीष भंगिरे, नितीन हासे यांनी विविध सूचना मांडल्या.
गेल्या आर्थिक वर्षात संस्थेला ४३ लाख ७५ लाख रुपये नफा झाला असून सभासदांना ६.५७ टक्के दराने लाभांश वाटप करण्याची घोषणा यावेळी संचालक मंडळाच्यावतीने करण्यात आली. संचालक मंडळाच्या गेल्या चार वर्षांच्या कालावधीत सभासदांनी केलेले सहकार्य व उद्योग समुहाच्या संचालकांसह वरीष्ठ अधिकार्यांचे मार्गदर्शन लाभदायी ठरल्याचे चेअरमन वाजपेयी यांनी प्रास्तविकात सांगितले. मुरारी देशपांडे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
COMMENTS