अहमदनगर । नगर सह्याद्री शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने पक्षाच्या वेगवेगळ्या फ्रंटल, सेल, आघाड्यांच्या नियुक्ती केल्या जात आहेत. रोजगार व स्वयं...
अहमदनगर । नगर सह्याद्री
शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने पक्षाच्या वेगवेगळ्या फ्रंटल, सेल, आघाड्यांच्या नियुक्ती केल्या जात आहेत. रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी राणी पंडित यांची निवड करण्यात आली आहे. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या शिफारशीने, माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेने विभागाचे प्रदेशाध्यक्ष योगेश मसलगे यांनी पंडित यांची निवड मुंबई येथून जाहीर केली असून राज्याचे माजी गृह, परिवहन राज्यमंत्री आ. सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते पंडित यांना नुकतेच नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे.
पंडित या महिला काँग्रेसच्या माध्यमातून पक्षात सक्रियपणे काम करत आहेत. त्यांच्यावर महिला काँग्रेसच्या शहर जिल्हा उपाध्यक्ष पदाची सुरुवातीला जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांना पक्षात बढती देण्यात आली असून त्यांच्यावर रोजगार व स्वयंरोजगार विभागाचा स्वतंत्र पदभार सोपविण्यात आला आहे. नियुक्ती बद्दल आ. पाटील व जिल्हाध्यक्ष काळे यांच्या हस्ते पंडीत यांचा सत्कार करण्यात आला आहे.
यावेळी मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, अनिस चुडीवाला, प्रवीण गीते, अभिनय गायकवाड, फैयाज शेख, ललिता मुदिगंटी, पुनम वंनम, ज्योती साठे, मोमीन मिनाज, अर्चना पाटोळे, आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS