अहमदनगर । नगर सह्याद्री ज्येष्ठ संगीतज्ञ व संस्कृत पंडित डॉ.देवीप्रसाद खरवंडीकर यांनी संगीत व संस्कृत क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदाना मुळ...
अहमदनगर । नगर सह्याद्री
ज्येष्ठ संगीतज्ञ व संस्कृत पंडित डॉ.देवीप्रसाद खरवंडीकर यांनी संगीत व संस्कृत क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदाना मुळेच त्यांना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचा मानाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. ही बाब नगरकरांसाठी अभिमानास्पद आहे. कोणत्याही संगीत घराण्याचे शिक्षण न घेता डॉ.देवीप्रसाद खरवंडीकर यांनी स्वयंभूपणे अध्यायन करत आपली गायकी विकसित केले आहे. आपल्या श्रुती संगीत नीकेतनच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थी घडवले आहेत. आजपर्यंत त्यांनी केलेल्या संगीत सेवेची पावती त्यांना या पुरस्कार रूपाने मिळाली आहे. असे महान व्यक्तिमत्व आपल्या नगरचे भूषण आहेत, असे प्रीपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ.अनिल सहस्त्रबुद्धे यांनी केले. नगर येथील विख्यात संगीतज्ञ आणि संस्कृत पंडित डॉ.देवीप्रसाद खरवंडीकर यांना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे देण्यात येणरा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल आनंदोत्सव ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे व विश्वस्त सौ.उषा सहस्रबुद्धे यांनी त्यांचा घरी जाऊन सत्कार व अभिनंदन केले. यावेळी आनंदोत्सव परिवारातील प्रा. डॉ.मच्छींद्र मालुंजकर, प्रा.डॉ.राजू रिक्कल, सौ. कीर्ती खरवंडीकर, डॉ.धनश्री खरवंडीकर, मकरंद खरवंडीकर आदी उपस्थित होते. या पूर्वी डॉ.खरवंडीकर यांना संस्कृत विषयातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल राष्ट्रपती पुरस्कार, महाराष्ट्र शासनाची संस्कृत पंडित ही उपाधी, नारद पत्रकारिता पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.यावेळी डॉ. देवीप्रसाद खरवंडीकर यांनी सर्वांचे आभार मानले. उपस्थित सर्वांशी चर्चा करताना त्यांनी संगीत क्षेत्रातिल अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.
COMMENTS