निघोज | नगर सह्याद्री आळकुटी येथील विखे पाटील महाविद्यालयात आययुएसी व वाणिज्य विभागाच्या माध्यमातून वाणिज्य मंडळाचे उद्घाटन व वाणिज्य क्षेत्...
आळकुटी येथील विखे पाटील महाविद्यालयात आययुएसी व वाणिज्य विभागाच्या माध्यमातून वाणिज्य मंडळाचे उद्घाटन व वाणिज्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा येथील वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. शिंदे एस.बी. लाभले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. शरद पारखे यांनी भूषविले.
सदर कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश म्हणजे वाणिज्य मंडळाचे उद्घाटन करून त्या अंतर्गत वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांना भविष्यात नवनवीन रोजगाराच्या संधी कोणत्या आहेत यांची माहिती व्हावी; की जेणेकरून विद्यार्थ्यांना आपल्या करिअरला भविष्यात योग्य वळण देता यावे हा उद्देश होता. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. शिंदे यांनी रोजगाराच्या नवनवीन संधी कोणत्या आहेत व आता संगणकाच्या युगात फक्त बी.कॉम. व एम. कॉम. डिग्री घेत असताना आपण व्यावसायिक व प्रोफेशनल स्किल आत्मसात केले पाहिजे;की जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मिळवताना अडचणी येणार नाही. विद्यार्थ्यांना सीए,आयसीडब्ल्यूए, बँकिंग क्षेत्रातील परीक्षा व लाँ सारख्या क्षेत्रात करिअरच्या खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत;परंतु यासाठी विद्यार्थ्यांनी आपला न्यूनगंड बाजूला ठेवून कायम सकारात्मक दृष्टिकोन बाळगला पाहिजे, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. झावरे आर. जे., प्रमुख पाहुण्यांचा परिचय वाणिज्य विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. शांताबाई थोरात यांनी करून दिला. प्रा. बोर्हुडे , प्रा. मोहन माने यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वाती फापाळे यांनी केले व वाणिज्य विभागाचे प्रा. गेटम एस . के. यांनी आभार व्यक्त केले.
COMMENTS