जागतिक मानसिक स्वास्थ्य दिनानिमित्त आयोजित मॅरेथॉनला मोठा प्रतिसाद अहमदनगर । नगर सह्याद्री ज्या प्रमाणे शारीरिक स्वास्थ्य महत्वाचे आहे. त...
जागतिक मानसिक स्वास्थ्य दिनानिमित्त आयोजित मॅरेथॉनला मोठा प्रतिसाद
अहमदनगर । नगर सह्याद्री
ज्या प्रमाणे शारीरिक स्वास्थ्य महत्वाचे आहे. त्याच प्रमाणे मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी मैदानी खेळ, ज्या मध्ये जॉगिंग हे एकप्रकारे ध्यानधारणा करण्यासारखेच आहे. यावर प्रत्येकाने लक्ष देणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन सहायक आयकर आयुक्त अशोक मुराई यानी केले.
साईदीप हॉस्पिटल, रामावतार मानधना ट्रस्ट व तिरंगा फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मानसिक स्वास्थ्य दिनानिम्मित मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अशोक मुराई, साईदीप हॉस्पिटलचे चेअरमन ड़ॉ. दीपक एस.एस व मोहनलाल मानधना यांच्या हस्ते मॅरेथॉन ला झेंडा दाखवून सुरवात करण्यात आली. यावेळी मुराई पुढे म्हणाले की, शरीर स्वस्थ असले की आपोआपच मन देखील स्वस्थ रहते. पण आज धकाधकीच्या जीवनात आपण सगळ्या गोष्टी करण्यासाठी वेळ देतो, फक्त आपल्या शरीराला वेळ देत नाही. त्यामुळे आजारपणाला निमंत्रण मिळते. म्हणून शारीरिक स्वास्थ्य चांगले ठेवल्यास मानसिक स्वास्थ्य ही उत्तम राहते आणि आजारपण सुद्धा लांब ठेवण्यास मदत मिळते.
ड़ॉ. दीपक म्हणाले की, सध्या इलेक्ट्रॉनिक गैजेटस चा वापर खुप केला जातो. या मुळे नैराश्य येऊन मानसिक स्थिति देखील बिघड़ते. रोज किमान 1 ते 2 तास स्वतःच्या शरीरासाठी दिलेच पाहिजे. यामुळे मन स्वास्थ्य आणि शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते. जागतिक मानसिक स्वास्थ्य दिनानिम्मित दि 3 ते 10 ऑक्टोबर दरम्यान मानसिक स्वास्थ्य सप्ताह अंतर्गत जानकीबाई आप्टे मूक बधिर विद्यालय येथे चित्रकला स्पर्धा, जिल्ह्यातील सर्व डॉक्टर्स चे एक परिसंवाद ज्याला मुंबई येथील प्रसिद्ध मनोविकार तज्ञ ड़ॉ नीलेश शाह यानी संबोधित केले. या वेळी साईदीप हॉस्पिटलचे संचालक, हेल्थ केयर ट्रस्टच्या सर्व महिला संचालिका, तिरंगा फॉउंडेशन चे सर्व सदस्य, नागरिक, महिला आणि मुले मॅरेथॉन मध्ये सहभागी झाले होते. साईदीप हॉस्पिटल चे सर्व संचालक ड़ॉ. शाम केकड़े, ड़ॉ आर आर धूत, ड़ॉ. निसार शेख, डॉ. रविन्द्र सोमाणी, ड़ॉ. कैलाश झालानी, ड़ॉ. हरमीत कथूरिया, ड़ॉ. अनिल कुर्हाडे, ड़ॉ. इक़बाल शेख , डॉ. संगीता कुलकर्णी, ड़ॉ. किरण दीपक, ड़ॉ. वैशाली किरण, ड़ॉ. अनिकेत कुर्हाडे, डॉ. कस्तूरी कुर्हाडे, डॉॅ. अश्विन झालानी, ड़ॉ. रोहित धूत,़ डॉ. पायल धूत, ड़ॉ. भूषण खर्चे, ड़ा.ॅ श्रीधर बधे, ड़ॉ. गणेश सारड़ा, ड़ॉ. साहिल शेख, साईदीप हेल्थ केयर ट्रस्ट च्या अध्यक्षा नंदा सोमाणी, मुख्य प्रवर्तक ज्योति दीपक, रोहिणी कुरहड़े, अनिता झालानी, शोभा धूत, सुनीता देशपांडे, अंजू कथूरिया, व अन्य मान्यवर उपस्थित होते.
COMMENTS