सावित्री ज्योती महोत्सव व बचतगट प्रदर्शनाचे उद्घाटन अहमदनगर । नगर सह्याद्री महिलांनी संसार सांभाळून आपला व्यवसाय उभारावा. व्यवसायात उभा क...
सावित्री ज्योती महोत्सव व बचतगट प्रदर्शनाचे उद्घाटन
अहमदनगर । नगर सह्याद्री
महिलांनी संसार सांभाळून आपला व्यवसाय उभारावा. व्यवसायात उभा करताना संसार सांभाळणे ही प्रथम जबाबदारी समोर ठेऊन आपल्या कला-गुणांना वाव द्यावे. व्यवसाय उभारल्यास कुटुंबाला आर्थिक पाठबळ मिळून संसाराचा गाडा व्यवस्थित चालणार असल्याचे प्रतिपादन धर्मदाय उपायुक्त तथा न्यायाधीश उषा पाटील यांनी केले.
सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयात आयोजित राज्यस्तरीय सावित्री ज्योती महोत्सव व बचतगटांच्या उत्पादनांच्या प्रदर्शन आणि विक्री स्टॉलच्या उद्घाटनाप्रसंगी न्यायाधीश पाटील बोलत होत्या. यावेळी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात, सरकारी वकील अॅड. सुभाष भोर, अॅड. सुरेश लगड, शहर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष भुषण बर्हाटे, विशेष समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, शब्दगंध साहित्य परिषदेचे राजेंद्र उदागे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे पैठणे, रावसाहेब मगर, मेहेरबाबा ट्रस्टचे मेहेरनाथ कलचुरी, समाजकार्य महाविद्यालयाचे झारे, अमोल बागुल, अॅड. सुनिल तोडकर, जयश्री शिंदे, स्वाती बनकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
न्यायाधीश पाटील म्हणाल्या की, कुटुंबात महिलांचे स्वातंत्र्य जपले गेले पाहिजे, बंधनात न अडकविता तिला भरारी घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. महिलांच्या कला-गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सावित्री ज्योती महोत्सवाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
अॅड. सुरेश लगड म्हणाले की, समाजाची नाळ जोडलेला सावित्री ज्योती महोत्सव असून, या महोत्सवात बचत गटातील महिलांना प्रोत्साहन देण्यात आले आहे.
COMMENTS