मुलिकादेवी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा निघोज | नगर सह्याद्री आज सोशल मिडिया माध्यमातून ९० टक्के लोक कार्यरत आहेत. मात्र यामध्ये वाचन ...
मुलिकादेवी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
निघोज | नगर सह्याद्रीआज सोशल मिडिया माध्यमातून ९० टक्के लोक कार्यरत आहेत. मात्र यामध्ये वाचन हा विषय सर्वाधिक महत्वाचा असून वाचनाने माणूस समृद्ध होतो, असे प्रतिपादन मुलिका देवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सहदेव आहेर यांनी व्यक्त केले आहे. पारनेर तालुयातील निघोज येथील श्री मुलीकादेवी महाविद्यालय येथे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध कवि सुमित गुणवंत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
प्राचार्य डॉ. सहदेव आहेर म्हणाले की, विद्यार्थ्यांना आयुष्यात वाचनाचे महत्व समजावे, त्यांच्यात वाचण संस्कृती रुजावी या निमित्ताने हा दिवस साजरा केला जातो. जास्तीत जास्त पुस्तकांचे वाचन केल्याने माणसाचा आपल्या सभोवताली असणार्या परिसराकडे, समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो पुस्तके वाचल्याने माणसाला आपल्या आजूबाजूची आपल्या सहवासातील माणसंही वाचता येतात माणसांच्या भावना समजतात आणि आपण एकमेकांना समजून घेऊ शकतो एकमेकांना समजून घेतल्याने आपल्यामध्ये माणुसकीची भावना वृद्धिंगत होते .सोशल मिडिया माध्यमातून आज ९० टक्के लोक कार्यरत आहेत.सोशल मिडिया हे माध्यम चांगले आहे.मात्र यामध्ये सुद्धा कथा,कादंबर्या, समाजप्रबोधन करणारे ग्रंथ, किंवा मेसेज, वृत्तपत्र याचे वाचन होण्याची खर्या अर्थाने गरज असल्याचे प्रतिपादन डॉटर आहेर यांनी व्यक्त केले आहे.
कवी सुमित गुणवंत म्हणाले की वाचनाने सामाजिक जाणीवा विकसित होतात. आज तंत्रज्ञानाच्या व संगणकाच्या युगामध्ये माणूस इतका संकुचित बनलेला आहे की त्याचे वाचनाकडे दुर्लक्ष झाले आहे. महाविद्यालयातील अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागते त्यामुळे असे उपक्रम सातत्याने महाविद्यालयांमध्ये होणे गरजेचे आहे असे मत नमूद केले. ग्रंथपाल प्रा.दुर्गा रायकर यांनी यावेळी प्रास्ताविक केले त्यांनी महाविद्यालयातील ग्रंथालयात अवांतर पुस्तके, संदर्भग्रंथ, पाठ्यपुस्तके व विविध नियतकालिके असे एकूण सहा हजार पेक्षा अधिक पुस्तके असल्याची माहिती दिली. डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात पाहुणे परिचय प्रा. नूतन गायकवाड यांनी केले सूत्रसंचालन प्रा. प्रविण जाधव तर आभार प्रा. अश्विनी सुपेकर यांनी मांडले.
COMMENTS