अहमदनगर | नगर सह्याद्री सावेडी उपनगरातील गुलमोहर रोडवरील गजानन महाराजांचे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने ...
अहमदनगर | नगर सह्याद्री
सावेडी उपनगरातील गुलमोहर रोडवरील गजानन महाराजांचे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने येत असतात. भाविकांची गैरसोय होऊ नये तसेच मंदिर परिसराचे सुशोभीकरण व्हावे यासाठी नगरसेवक रामदास आंधळे यांनी आपल्या निधीतून मंदिर परिसरामध्ये पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचे काम केले आहे त्यामुळे मंदिर परिसरामध्ये सुशोभीकरणाचे काम मार्गी लागणार आहे. युवकांमध्ये अध्यात्मिक व धार्मिकतेची गोडी निर्माण व्हावी यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे गरजेचे आहे. नवले नगर परिसरातील नागरिकांनी गजानन महाराजांचे भव्य दिव्य मंदिर उभे केले आहे. या ठिकाणी वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सर्वजण एकत्रित येऊन गुण्या गोविंदाने गजानन महाराजांचा जन्मोत्सव सादर करीत आहे, असे प्रतिपादन माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी यावेळी केले.
सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड परिसरातील गजानन महाराज मंदिर परिसरात नगरसेवक रामदास आंधळे यांच्या प्रयत्नातून पेव्हिंग ब्लॉक कामाचा शुभारंभ माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी कुमार नवले, शिरीष जानवे, अॅड. मंगेश सोले, विनोद भिंगारे, अशोक गायकवाड, बाळासाहेब जगदंड, देविदास मस्के, आदिनाथ मस्के, योगेश खरमाळे, निशिगंध प्रभुणे, राजन नवले, ओजेश नवले, पुष्कर कुलकर्णी, नरेंद्र तागड, निलेश जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक रामदास आंधळे म्हणाले, गजानन महाराजांचे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे या ठिकाणी भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात या मंदिर परिसराचे सुशोभीकरणाचे काम मार्गी लागावे म्हणून महापालिकेच्या माध्यमातून पेव्हिंग ब्लॉकचे काम हाती घेतले आहे.
COMMENTS