जलजीवन मिशन आराखड्याला मविआच्या काळातच मंजुरी - सरपंचांची माहिती

  166 कोटींच्या मंजुर योजना तर 134 कोटींच्या प्रस्तावित पारनेर । नगर सह्याद्री  तालुक्यातील विविध गावांना जल जीवन मिशन अंतर्गत मंजुर झालेल्य...

 




166 कोटींच्या मंजुर योजना तर 134 कोटींच्या प्रस्तावित

पारनेर । नगर सह्याद्री 

तालुक्यातील विविध गावांना जल जीवन मिशन अंतर्गत मंजुर झालेल्या योजनांचा सन 2021 मध्येच आराखडयात समावेश करण्यात आला असून महाविकास अघाडीचे सरकार सत्तेवर असतानाच या योजनांना प्रशासकिय मान्यता मिळाली असल्याचे माजी सभापती सुदाम पवार व बाळासाहेब खिलारी यांच्यासह टाकळी ढोकेश्वरच्या सरपंच अरूणा खिलारी, मांडवे खुर्दचे सरपंच सोमनाथ आहेर, पिंपरी पठाराचे उपसरपंच अनिल शिंदे,  रोहिणी ठाणगे, प्रकाश गाजरे, सुवर्णा आहेर, पियुष गाजरे, वैशाली चिकणे, चित्रा घोलप, बापू ठुबे यांच्यासह योजना मंजुर असलेल्या सर्व गावांचे सरपंच व प्रमुख कार्यकर्त्यांनी या योजनेचे श्रेय केवळ आ. नीलेश लंके यांनाच असल्याचे ठामपणे सांगितले. या संबंधीचे पुरावे सरपंचांनी पत्रकार परीषदेत दाखविले. दरम्यान या कामांसाठी आमदार नीलेश लंके यांनी पाठपुरवा केला, या कामांचे श्रेय केवळ आ. लंके यांनाच आहे. भाजपाचे खा. सुजय विखे अथवा तालुक्यातील भाजपा पुढार्‍यांचा त्याच्याशी काहीही सबंध नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

166 कोटींच्या कामांना प्रशासकिय मंजुरी मिळालेली आहे तर 134 कोटींच्या योजना प्रस्तावित आहेत. यासंदर्भात प्रसिध्दीस देण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, 24 ऑक्टोबर 2021 रोजी तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत पारनेर तालुक्यातील 93 गावांचा आराखडयात समावेश करण्यास मान्यता देण्यात आली. तर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर येण्यापूर्वीच या योजनांना प्रशासकिय मान्यता मिळालेली आहे.तर भाजपा नेत्यांकडून 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती प्रसारित करण्यात आली आहे परंतु 100 नव्हे, 166 कोटी निधी उपलब्ध झाला असल्याचे सांगण्यात आले. जलजीवन मिशन योजनेची 100 कोटी रूपयांची कामे खा. सुजय विखे यांनी मंजुर केल्याचे तालुक्यातील भाजपा पुढारी सांगत आहेत. प्रत्यक्षात या कामांसाठी 165 कोटी 82 लाख 74 हजार 732 रूपयांचा निधी मंजुर झाला असल्याचा दावा लंके समर्थक सरपंचांनी केला आहे.


134 कोटींची प्रस्तावित कामे

मंजुर गावांव्यतीरिक्त तालुक्यातील भोयरे गांगर्डा, देसवडे, देवीभोयरे, धोत्रे बु, धोत्रे खुर्द, हिवरे कोरडा, पाडळी कान्हूर, माळकूप, गोरेगाव, लोणीमावळा, रूईछत्रपती, वाळवणे, रायतळे, पिंपरीगवळी, सावरगाव, वडझिरे, शेरीकोलदरा, वासुंंदे, राळेगणसिध्दी, शिरापूर, माजमपूर, हकीगतपुर, बाभुळवाडे, खडकवाडी, तास, वनकुटे, निघोज, मोरवाडी, ढवनवाडी, शिरसुले, वडगांव गुंड, जवळा, काताळवेढे, डोंगरवाडी, पळवे बु. पळवे खु. या गावांमध्येही पाणी योजना राबविण्यात येणार असून त्यासाठी 133 कोटी 67 लाख 52 हजार खर्च अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले. या कामांनाही लवकरच मंजुरी मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. पवार आरोग्य मंदीरासाठी आम्ही कोणतेही अनुदान मिळावे यासाठी कोणताही प्रस्ताव शासन दरबारी पाठविलेला नाही व कोणतेही अनुदान सुद्धा मिळालेलेे नाही. टिका टिपन्नी करणार्‍यांनी अभ्यासपुर्ण माहीती घेऊनच टिका करावी अथवा कोव्हीड रूग्णांची माफी मागावी. गावोगावचे सहकारी, दानशुर व्यक्ती तसेच देश परदेशातून आलेल्या मदतीतून हे सेंटर चालविण्यात आले असल्याचे नीलेश लंके प्रतिष्ठानचे राज्य अध्यक्ष सुदाम पवार यांनी सांगितले.


आपल्या परीवाराला कधी देवदर्शनाला नेले का?

कोरोना सेंटरमुळे आ. नीलेश लंके यांचे नाव जगभरात झाले आहे. त्याचीच पोटदुखी विरोधकांना आहे. कोरोना सेंटरला कीती निधी मिळाला, मोहटादेवी दर्शनासाठी कोणी खर्च केला याची विचारणा करणार्‍यांनी कोरोना काळात किती रूग्णांना मदत केली याचे जनतेला उत्तर द्यावे, रेमडीसिविर इंजेक्शनसाठी किती पैसे उकळले हे तालुक्याला माहीती आहे. आपण आपल्या परीवाराला कधी देवदर्शनाला नेले का ? गोरगरीब जनतेला देवदर्शन होत असताना तुमची पोटदुखी का? असा सवाल राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष राजेश्वरी कोठावळे, तालुकाध्यक्ष पुनम मुंगसे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सुवर्णा धाडगे यांनी केला आहे. 


COMMENTS

Name

Accident,33,Ahmednagar,7224,Akole,20,braking,43,Breaking,5105,Business,4,corona,558,Crime,1423,e,2,economics,11,Editorial,29,education,146,Entertainment,1323,Epaper,29,Health,390,indan,8,India,1203,Jamkhed,45,Karjat,9,Kopargaon,6,loni,28,m,1,ma,1,Maharashtra,4807,manoranjan,13,Mumbai,203,Nagar,291,Newasa,65,Parner,3008,Parner Ahmednagar,54,Parner-news-sujit-zaware-sosiety-ele-1037893,2,Pathardi,19,Politics,1255,Rahata,45,Rahuri,19,SadPadsad,19,sampadkiy,99,Sangamner,152,Saripath,44,Shevgaon,11,shivvyakhyate-tapkir-news,1,Shrigonda,131,Shrirampur,9,Sport,271,sports,40,weather,32,World,122,
ltr
item
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री: जलजीवन मिशन आराखड्याला मविआच्या काळातच मंजुरी - सरपंचांची माहिती
जलजीवन मिशन आराखड्याला मविआच्या काळातच मंजुरी - सरपंचांची माहिती
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg2zNU0nYW9RaKDCGUksfZHvaYekpE4b37J2pA1nmB1KsDRSsXpEyfq6RQN-1EAUxtrP6ani_lsvb4CGUtA1eNg7xskESn2LN0KREqgDlGp_XyrOmWrRR9d62nsvVR4JgP-pvk-AfCe-CXQhEJNsNu4MU0VIOwzidzbagCIAhz8pOtHYVJxGKRJNVku/w640-h383/jal.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg2zNU0nYW9RaKDCGUksfZHvaYekpE4b37J2pA1nmB1KsDRSsXpEyfq6RQN-1EAUxtrP6ani_lsvb4CGUtA1eNg7xskESn2LN0KREqgDlGp_XyrOmWrRR9d62nsvVR4JgP-pvk-AfCe-CXQhEJNsNu4MU0VIOwzidzbagCIAhz8pOtHYVJxGKRJNVku/s72-w640-c-h383/jal.jpg
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री
https://www.nagarsahyadri.com/2022/10/blog-post_17.html
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/2022/10/blog-post_17.html
true
3854568444215913215
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content