अहमदनगर / नगर सह्याद्री - हिंदुराष्ट्र सेनेच्यावतीने नगर शहरात दिल्लीगेट तसेच उपनगरात कृत्रिम प्लास्टिक फुलाची होळी करण्यात आली. हिंदूराष्...
अहमदनगर / नगर सह्याद्री -
हिंदुराष्ट्र सेनेच्यावतीने नगर शहरात दिल्लीगेट तसेच उपनगरात कृत्रिम प्लास्टिक फुलाची होळी करण्यात आली. हिंदूराष्ट्र सेने धनंजयभाई देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष संजय आडोळे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या राष्ट्रवीरांसह ही होळी करण्यात आली.
या आंदोलनात पदाधिकारी निखिल धंगेकर, महेंद्र येनगुल, संदिप भुसे, रुद्रेश अंबाडे, अमोल बारस्कर, ऋषीकेश चव्हाण, ऋषी नागरगोजे, भूषण तलेकर, सागर जाधव, निलेश शिंदे , चिराग चव्हाण, तुषार सापते, राज सुर्यवंशी, ओंकार हारदे, राम भिंगारे, लोकेश साळुंखे, तुषार रामदासी, संतोष चेन्नुर, यश दुबे, साहिल पवार, ओंकार भागनगरे, शुभम कर्डिले, अजय ढवळे, अमोल बोल्ली, समर्थ गोसावी, आकाश वाबळे, केतन बडवे, आकाश शेळके, शेखर दंडवते, प्रवीण बारस्कर, सचिन अडगटला, प्रशांत देठे, सागर अष्टेकर, प्रवीण आंधळे, शुभम भाळवणकर, देवेंद्र गोळे, पूजा बारस्कर, सिध्दी सोनार, किर्ती बेल्हेकर यांसह अनेक राष्ट्रवीर हे उपस्थित होते.
यावेळी संजय आडोळे म्हणाले, हिंदू राष्ट्र सेनेच्यावतीने दीड महिन्यांपूर्वीच प्रशासनाला, मुख्यमंत्र्यांना व उपमुख्यमंत्र्यांसहीत पर्यावरण मंत्र्यानाही निवेदनाव्दारे या कृत्रिम प्लॅस्टीक फुलांवर बंदीची मागणी केली होती. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे व शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. परंतु या कृत्रिम आणि प्लास्टिक फुलाच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्था ही कुठेतरी खिळखिळी करण्याचा परदेशी व देशद्रोही शक्तींचा प्रयत्न आहे. प्लॅस्टिक बंदी असूनही या कृत्रिम फुलांद्वारे मोठ्या प्रमाणावर हे प्लॅस्टिक बाजारात व समाजात पसरत आहे, यामुळे शेतकर्याची व पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. अतिवृष्टीमुळे आधीच सर्व पिकं पाण्याखाली गेली आहेत, त्यात हे कृत्रिम फुल बाजारात आल्याने शेतकर्याचे व देशाचे नुकसान होत आहे. म्हणूनच हिंदूराष्ट्र सेनेने या कृत्रिम फुलांची होळी केली, असल्याचे अडोळे यांनी सांगितले.
विशेष म्हणजे हिंदूराष्ट्र सेनेने कृत्रिम आणि प्लास्टिकच्या फुलांचा वापर टाळावा यासाठी सुंदर संदेश रथ तयार केरून चौका चौका जनजागृतीही केली. यापुढे हिंदूराष्ट्र सेना सामान्य नागरिकांच्या विविध समस्या व हक्कांच्या लढ्यासाठी सदैव तत्पर राहील असेही हिंदूराष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय आडोळे यांनी सांगितले.
COMMENTS