अहमदनगर महाविद्यालयात वर्ल्ड इनव्हेस्टर वीक २०२२ साजरा अहमदनगर | नगर सह्याद्री वाढत चाललेली महागाई व त्यांमुळे वाढत चाललेल्या आर्थिक गरजा ...
अहमदनगर महाविद्यालयात वर्ल्ड इनव्हेस्टर वीक २०२२ साजरा
अहमदनगर | नगर सह्याद्रीवाढत चाललेली महागाई व त्यांमुळे वाढत चाललेल्या आर्थिक गरजा लक्षात घेता, प्रत्येकाला त्यांच्या बचतीवर अधिक लक्ष केंद्रित करायला हवे. कारण जितके जास्त पैसे तुम्ही बचत कराल तितकेच जास्त आत्मविश्वासाने तुम्ही आर्थिक अडचणींना सामोरे जाल. बचत करण्याबरोबरच तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. कारण तुमचे भविष्य सुखी व समाधानी असण्यासाठी गुंतवणूक हा सर्वात महत्वाचा मार्ग आहे. नियमित गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही नियमितपणे एक रक्कम बाजूला ठेवायला हवी, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.आर.जे. बार्नबस यांनी केले.
अहमदनगर महाविद्यालयात वर्ल्ड इनव्हेस्टर वीक २०२२ चे उद्घाटन अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. नोवेल पारगे, डॉ. सय्यद रज्जाक, प्रा. प्रीतम बेदरकर, श्री. साई सुरम उपस्थित होते.
प्राचार्य डॉ.बार्नबस म्हणाले, मेहनतीचा पैसा वाचवण्यासोबतच तो वाढवायलाही हवा. संपत्ती निर्मिती ही प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाची बाब आहे. संपत्ती ही फक्त वर्तमानातील आयुष्य जगण्यासाठी नव्हे, तर वाढत जाणार्या गरजा, महागाई, पुढे बदलत जाणारी आपली आर्थिक उद्दिष्टे या सर्व गोष्टींचा विचार करता, भविष्यातील आयुष्य जगण्यासाठी देखील संपत्ती आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा.तृप्ती खाबिया सांगितले की, आधुनिक काळात बचत आणि गुंतवणूक ही खूप महत्त्वाची आहे हे जितया लहान वयात समजेल तेवढे भविष्यात जास्त फायदा मिळेल हाच विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी अहमदनगर महाविद्यालय बिजनेस ऍडमिनिस्ट्रेशन विभागाच्या वतीने वर्ल्ड इनव्हेस्टर वीक २०२२ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत आठवडाभर वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले. यामध्ये पोस्टर प्रेसेंटेशन, क्वीज कॉम्पिटिशन, एसे कॉम्पिटिशन, तर्फे रवींद्र सिंग चावला यांचे वेबिनार तसेच जुन्या काळी शेर मार्केटचा कारभार बोली लावून व्हायचा तसेच रोड प्ले करून मॉकस्टॉक असे अनेक उपक्रम घेण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन विभाग प्रमुख डॉ. सुशिता अय्यर यांनी केले. कार्यक्रमाचे स्वागत प्रा.सपना स्वामी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. निधी पटेल यांनी मानले.तसेच कार्यक्रमाच्या नियोजनात शितल कुलकर्णी, प्रा.गीता वर्मा, लक्ष्मी नवलानी, मोनिका खूबचंदानी, ऋषिकेश गायके आदींनी परिश्रम घेतले.
COMMENTS