कान्हूरपठार येथील घटना । पैशांसाठी लावला होता तगादा पारनेर । नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथील एकाने कैलास लोंढेसह तिघांनी...
कान्हूरपठार येथील घटना । पैशांसाठी लावला होता तगादा
पारनेर । नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथील एकाने कैलास लोंढेसह तिघांनी पैशांसाठी लावलेल्या तगाद्याच्या त्रासातून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. भागचंद धोंडीभाऊ व्यवहारे असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. या संदर्भात पारनेर पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतीश भागचंद व्यवहारे यांनी फिर्याद दिली. कैलास आप्पाजी लोंढे, कल्पना कैलास लोंढे, सुभाष आप्पाजी लोंढे (सर्व रा. कान्हूरपठार, ता. पारनेर) अशी आरोपींची नावे आहेत.
पारनेर तालुक्यातील अभिनव पतसंस्थेकडून सन 2007 साली याच पतसंस्थेत सचिव म्हणून कार्यरत असताना मयत व्यवहारे यांनी कर्ज घेतले होते. त्यांची शेती कर्जाला तारण होती. या कर्जाच्या अनुषंगाने दि. 4 रोजी संघध्याकाळी सातच्या दरम्यान सखाराम ठुबे यांच्या घरी ठुबे मळा याठिकाणी अभिनव पतसंस्थेमार्फत कैलास लोंढे, सुरेश घुमटकर तसेच बंधू गणेश आणि महेश असे उपस्थित होते. मध्यस्थी कामी सखाराम ठुबे होते. त्यावेळी कैलास लोंढे याने नमुद कर्ज व इतर फायलींच्या अनुषंगाने 25 लाख रूपयांची मागणी केली होती.
दि. 5 रोजी सकाळी सहाच्या दरम्यान बबन संजय व्यवहारे (रा. कान्हूरपठार) यांनी फोनद्वारे भागचंद्र व्यवहारे यांनी नारायण टेकडी येथे आत्महत्या केली असल्याची माहिती फिर्यादी सतीश यांना दिली. त्यानंतर याबाबत पोलिसांना कळविण्यात आले असता पोलिसांनी पंचनामा केला. मयत भागचंद्र यांनी आत्महत्येपुर्वी चिट्ठी लिहून ठेवली होती. त्यात 2007 साली 15 लाख रूपये कर्ज घेतल्याचे नमुद करत मी व माझ्या कुटुंबाला कैलास लोंढे, कैलालची पत्नी कल्पना, त्यांचा भाऊ सुभाष लोंढे यांनी त्रास देऊन वेळोवेळी धमकी देऊन बोगस फाईल दाखवून त्रास देत आहेत. त्यामुळे मागेसुद्धा विष घेण्याचा प्रयत्न केला होता. आता मुलांच्या नावे खातेवाटप केल्यानंतर कैलास लोंढे, सुभाष लोंढे यांनी मला धमकी दिली. त्यामुळे आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येस कैलास लोंढे, सुभाष लोंढे यांचे कुटुंब जबाबदार आहे, असा उल्लेख चिट्ठीत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक घनशाम बळप करत आहेत.
COMMENTS