अमर कतारी यांची निवेदनाद्वारे मागणी संगमनेर | नगर सह्याद्री गेल्या काही दिवसापासून भाजप शहराध्यक्ष श्रीराम गणपुले आणि शिवसेना उद्धव बाळासाह...
अमर कतारी यांची निवेदनाद्वारे मागणी
संगमनेर | नगर सह्याद्रीगेल्या काही दिवसापासून भाजप शहराध्यक्ष श्रीराम गणपुले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख अमर कतारी यांच्या वादाने संपूर्ण संगमनेरचे राजकारण ढवळून निघत आहे. त्यातच आता शहर प्रमुख अमर कतारी यांनी नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर यांच्याकडे मागणी केली असून त्यात म्हटले आहे की,शहर ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव यांच्याकडून काढून घ्यावा तसेच त्यांची चौकशी करावी,त्याच सोबत भारतीय जनता पक्षाचे शहर प्रमुख श्रीराम गणपुले यांच्या वर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गु.र.नं. ६१४/२०२२ या प्रकरणात मुख्य सुत्रधार श्रीराम गणपुले असल्याची व त्यांच्या विरोधात फसवणुकीच्या उद्देशाने प्रॉपर्टीचे खोटे व बनावट सर्च रिपोर्ट तयार करण्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.तसेच शहर पोलिस ठाण्यात जतिन बत्रा यांच्या तक्रारी वरुण दाखल करण्यात आलेल्या २५ लाख रुपयांच्या फसवणुकीच्या या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक निवांत जाधव यांच्याकडे आहे. तक्रारदार बत्रा यांनी जाधव यांना वारंवार सांगून देखील आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला नाही उलट या प्रकरणी आर्थिक तडजोड करून आरोपीला फायदा होण्याच्या दृष्टीने तपासात कसूर करणे व जाणून बुजून गुन्ह्यात सोयीनुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे न्यायालयाने देखील या बाबत प्रश्नचिन्ह निर्माण करत चौकशीचे आदेश दिले आहेत सदर आदेशानुसार संबंधीतांवर कडक फौजदारी कारवाई करण्याची मागणी देखील या अर्जात करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यात तपास जाधव यांच्या कडून काढून घेत इतर सक्षम अधिकार्यां मार्फत चौकशी करावी ही मागणी करण्यात आली.
फिर्यादी बत्रा यांनी वेळोवेळी तपास अधिकारी व ठाणे अंमलदार यांना विनंती अर्ज देत कॉप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडचे व्यवस्थापक व श्रीराम गणपुले यांनी आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्याची मागणी केली मात्र पोलिस उपनिरीक्षक यांनी या दोघांना अभय देत फक्त शाम सोमनाथ माळवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जाधव यांचे वर्तन हे आरोपींना मदत करणारे असल्याने त्यांच्या कडून या गुन्ह्याचा तपास काढून घेत त्यांनी देखील चौकशी करण्यात यावी व भाजपा शहराध्यक्ष श्रीराम गणपुले आणि कॉप्री ग्लोबल कॅपिटल कंपनीचे व्यवस्थापक यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख अमर कतारी यांनी केली आहे. आता या प्रकरणात नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
COMMENTS