खासदार सुजय विखे पाटील यांचा पुढाकार अहमदनगर | नगर सह्याद्री जनतेचे प्रश्न जलद मार्गी लागावेत आणि प्रशासन अधिक गतीमान व्हावे या उद्देशाने त्...
खासदार सुजय विखे पाटील यांचा पुढाकार
अहमदनगर | नगर सह्याद्री
जनतेचे प्रश्न जलद मार्गी लागावेत आणि प्रशासन अधिक गतीमान व्हावे या उद्देशाने त्या-त्या सरकारी कार्यालयांमध्ये अद्ययावत अशा सर्व सुविधा उपलब्ध असल्या पाहिजे आणि त्या सुविधा नसतील तर प्रशासन गतीमान होणार कसे हे लक्षात येताच खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे आणि दुय्यम निबंधक कार्यालयांसाठी संगणक, प्रिंटरसह अन्य भौतिक सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीची माहिती संकलीत करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी स्वत: जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना दिले आहेत.
पोलिस स्टेशनसह अनेक शासकिय कार्यालयात सर्व सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक महत्त्वाची कामे देखील सुविधांअभावी प्रलंबित राहतात. शासकिय कार्यालयांमध्ये अद्ययावत अशा सर्व सुविधा उपलब्ध केल्यानंतर प्रशासन अधिक गतिमान होईल अशा विश्वास खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना वाटत आहे. यासाठी शासकिय कार्यालयांमध्ये संगणक, प्रिंटरसह अन्य महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय खा. विखे पाटील यांनी घेतला आहे. खा. विखे पाटील यांच्या या निर्णयाचे जिल्ह्यात स्वागत होत आहे.
COMMENTS