गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी विभागाने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या 'डी कंपनी'शी संबंधित पाच जणांना अटक केली आहे.
मुंबई - मुंबई गुन्हे शाखेने खंडणी प्रकरणी मंगळवारी मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी विभागाने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या 'डी कंपनी'शी संबंधित पाच जणांना अटक केली आहे. दाऊदचा जवळचा गँगस्टर छोटा शकील, रियाज भाटी आणि सलीम फ्रूट यांच्या अटकेनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
अजय गंडा, फिरोज लेदर, समीर खान, पापा पठाण आणि अमजद रेडकर अशी त्यांची नावे आहेत. वर्सोव्यातील एका व्यावसायिकाला धमकावून त्याच्याकडून ३० लाख रुपयांची कार आणि ७.५ लाख रुपयांची रोकड लुटण्यात या सर्वांची भूमिका समोर आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
COMMENTS