रोटरी मिडटाऊन लबच्यावतीने राष्ट्र निर्माता पुरस्कार देऊन शिक्षकांचा सन्मान अहमदनगर | नगर सह्याद्री समाज निर्मितीत शिक्षकवृंदाचा सिंहाचा वा...
रोटरी मिडटाऊन लबच्यावतीने राष्ट्र निर्माता पुरस्कार देऊन शिक्षकांचा सन्मान
अहमदनगर | नगर सह्याद्रीसमाज निर्मितीत शिक्षकवृंदाचा सिंहाचा वाटा असल्याने समाजाला जिवंत ठेवण्याचे काम शिक्षक करत असतात. विद्यार्थ्यांना घडवण्याचे मोठे आव्हान शिक्षकांपुढे असते ते तुम्ही लीलयापेलत पुढे जात आहेत. अंधक्कार दूर करून प्रकाशाची लागवड शिक्षक करीत असतात. सध्याच्या काळात शाळा व घराबाहेर मुलामुलींचे शोषण करण्याचे प्रमाण वाढले आहे. ते थोपवण्यासाठी शाळेतील मुलामुलींमध्ये प्रबोधन करण्याची वेळ आलेली आहे. यासाठी समाजातील सर्व जबाबदार घटकांनी एकत्र येवून काम करण्याची गरज आहे. प्रत्येक शाळा व महाविद्यालयात विधी सहाय्य केंद्र सुरु करण्याची परवानगी उच्च न्यायालयाने दिली आहे. यासाठी शाळांनी पुढाकार घ्यावा. समाजाचे दायित्व घेतलेल्या रोटरी लबचे काम खूप प्रशंसनीय आहे. त्यांच्या या कामात जिल्हा विधिसेवा प्राधिकरण सहभागी होत विविध उपक्रम राबवणार आहे. शिक्षाकांप्रती कृतज्ञता व्यक्त करून रोटरी मिडटाऊन लबने स्तुत्य काम केले आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाच्या सचिव भाग्यश्री पाटील यांनी केले.
सामाजिक क्षेत्रात पुढे असलेल्या रोटरी लब मिडटाऊनच्या वतीने ग्रामीण व शहरी भागात उत्कृष्ट ज्ञानदान करणार्या शिक्षकांना व कला, क्रीडा, संगीत शिक्षकांना राष्ट्र निर्माता पुरस्करफ देवून सन्मानित करण्यात आले. जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या.भाग्यश्री पाटील व जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. यावेळी रोटरी मिडटाऊन लबचे अध्यक्ष सतीश शिंगटे, सचिव तुषार देशमुख, रोटरीचे शिक्षण संचालक अॅड.हेमंत कराळे, शिक्षण सहसंचालक प्रा.दादासाहेब करंजुले आदींसह रोटरी लबचे सदस्य, पुरस्कारार्थी शिक्षक व नागरिक उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी अशोक कडूस म्हणाले, करोना गेला असला तरी त्यांचे दुष्परिणाम अजूनही दिसत आहेत. शालेय तसेच मोठ्या विद्यार्थ्यांमध्ये लिखाणाची सवय कमी झालेली असल्याने सर्व परिक्षांसाठी विद्यार्थ्यांची अनुपस्थित वाढत आहे. ही परीस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी शिक्षकांसह रोटरी सारख्या सेवाभावी संस्थांनी पुढे येत काम करणे आवश्यक आहे. रोटरी लबने शैक्षणिक क्षेत्रात मोठे काम केले आहे. ग्रामीण भागातील शाळांसाठी अनेक सोई सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. अध्यक्ष सतीश शिंगटे म्हणाले, पूर्ण जगात रोटरी लबचा मोठा विस्तार झाला असून आपल्या हजारो शाखांच्या शाखांच्या मध्यातून समाजसेवा लब करत आहे. पूर्ण जगात पोलिओ उच्चाटनामध्ये रोटरी लबचे मोठे योगदान आहे. प्रा.दादासाहेब करंजुले यांनी विद्यार्थ्यांमध्ये स्कील डेव्हलपमेंटला शिक्षकांनी प्राधान्य द्यावे असे सांगून आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून शिक्षण द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
COMMENTS