अरुणोदय हॉस्पिटलमधील मोफत आरोग्य शिबिरात 95 रुग्णांवर मुळव्याध शस्त्रक्रिया अहमदनगर । नगर सह्याद्री तापमानाच्या बदलामुळे मानवी जीवनावर वि...
अरुणोदय हॉस्पिटलमधील मोफत आरोग्य शिबिरात 95 रुग्णांवर मुळव्याध शस्त्रक्रिया
अहमदनगर । नगर सह्याद्री
तापमानाच्या बदलामुळे मानवी जीवनावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. आता आपण नवनवीन आजाराला सामोरे जात आहे. आहार शास्त्राला जीवनामध्ये अत्यंत महत्त्व आहे. आई-वडिलांनी आपल्या मुलांच्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्या कुटुंबातील व्यक्ती निर्व्यसनी व सुसंस्कृत असल्यास ते कुटुंब आनंददायी राहील. मोफत शिबिरामधून रुग्णांवर शस्त्रक्रिया करणारे अरुणोदय हॉस्पिटल हे पहिले हॉस्पिटल आहे. मानवतेच्या भावनेतून गरजू रुग्णांवर तपासणी व उपचार करीत आहे. माजी आमदार अरुणकाका जगताप यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत आपले कर्तव्य पार पाडले आहे. त्यांचाच वारसा घेऊन डॉ. शशिकांत फाटके व डॉक्टर वंदनाताई फाटके यांनी आरोग्य क्षेत्रामध्ये सुरू केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.
अरुणोदय सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलच्या वतीने मोफत मुळव्याध शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी संचालक डॉ. शशिकांत फाटके, डॉ. वंदनाताई फाटके, डॉ. प्रदीप तुपेरे, संतोष डबीर, डॉ. तुषार तनपुरे, अभिजीत खोसे, डॉ. इमरान शेख. आर एम मुन्शी, रिजवान अहमद खालीद जागीरदार, डॉ. नितीन समुद्र, डॉ.तुषार तनपुरे, संजय सपकाळ आदीसह रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. शशिकांत फाटके म्हणाले, की अरुणोदय हॉस्पिटलने शिबिराचे आयोजन करून सर्वसामान्य रुग्णांना आरोग्य सेवा देण्याचे काम केले आहे. नगर जिल्ह्यातील रुग्णांची सेवा करण्यासाठी अरुणोदय हॉस्पिटलची निर्मिती केली आहे. एका छताखाली आरोग्याच्या सर्व सुविधा नगरकरांना देण्यात येणार आहे. आता रुग्णांना मुंबई पुणे येथे जाण्याची गरज नाही. सुसज्ज असे हॉस्पिटल उभे राहिले आहे. नवनवीन तंत्रज्ञानाच्या आरोग्य सुविधा या ठिकाणी उपलब्ध झाले आहे. अरुणोदय हॉस्पिटल सर्वसामान्य रुग्णांना नेहमीच आधार देण्याचे काम करत राहील आज मोफत आरोग्य शिबिरात 95 रुग्णांवर मुळव्याध शस्त्रक्रिया यशस्वीपणे झाली असे ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. वंदनाताई फाटके यांनी केले.
COMMENTS