हॉस्पिटलमध्ये मोफत पोटाचे विकार तपासणी व उपचार शिबिराचे उद्घाटन अहमदनगर | नगर सह्याद्री अरुणोदय हॉस्पिटलमध्ये पुणे मुंबई सारख्या आरोग्य सु...
हॉस्पिटलमध्ये मोफत पोटाचे विकार तपासणी व उपचार शिबिराचे उद्घाटन
अरुणोदय हॉस्पिटलमध्ये पुणे मुंबई सारख्या आरोग्य सुविधा एकाच छाताखाली उपलब्ध आहे. कोविड काळामध्ये नागरिकांना आरोग्य सुविधा लवकर उपलब्ध होत नव्हत्या. आता नगर शहरात १५० बेडचे अरुणोदय हॉस्पिटल उभे राहिले आहे. त्यांनी खर्या अर्थाने शिबिराच्या माध्यमातून रुग्ण सेवा सुरू केले आहे. वेगवेगळ्या आजारांवर तज्ञ डॉटरांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरांच्या आयोजन केले आहे. या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांना लाभ होत आहे, असे प्रतिपादन मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी केले.
अरुणोदय सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये मोफत पोटाचे विकार तपासणी व उपचार शिबिराचे उद्घाटन मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे, संचालक डॉ.शशिकांत फाटके, डॉ. वंदनाताई फाटके, डॉ. संतोष पालवे, अभिजीत खोसे, नगरसेवक विपुल शेटीया, सुंमतीलाल कोठारी, माजी उपमहापौर दीपक सूळ, माजी स्थायी समिती सभापती अविनाश घुले, माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल, संजय झिंजे, दत्ता खैरे, विशाल पवार, मनीष फुलडहाळे, ठाकूर नवलानी, मतीन ठाकरे, दीपक लिपाने, मारुती पवार, सुदाम गांधले, संतोष हजारे आदी उपस्थित होते.
डॉ. शशिकांत फाटके म्हणाले, अरुणोदय हॉस्पिटलमध्ये मोफत तपासणी उपचार शिबिराबरोबरच रुग्णांमध्ये आरोग्याची जनजागृती करण्याचे काम केले जाते. आज पोटाचे विकार तपासणी शिबिरामध्ये रुग्णांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. आजार हे मोठ्या प्रमाणात व्यसनामुळे होत असतात. तरीही नागरिकांनी व्यसनापासून दूर राहावे. चांगला आहार घ्यावा. या शिबिरामध्ये डॉटरांची तपासणी ब्लड,शुगर, एसीजी,सीबीसी, रक्त तपासणी मोफत केली जात आहे. तसेच डिजिटल एस-रे, सिटीस्कॅन, एम आर आय, सोनोग्राफी आदी सह आरोग्यसेवा अल्पदरात दिल्या जात आहे, असे ते म्हणाले. या शिबिराचे आभार प्रदर्शन डॉ. वंदनाताई फाटके यांनी केले.
COMMENTS