मुंबई । नगर सह्याद्री - निवडणूक आयोगाने शिवसेनेबाबत निर्णय दिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोघांच्या भांडणामध्ये वर्षानुव...
मुंबई । नगर सह्याद्री -
निवडणूक आयोगाने शिवसेनेबाबत निर्णय दिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोघांच्या भांडणामध्ये वर्षानुवर्षाची पुण्याई गोठवली गेली आहे. असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. वाडवडिलांनी आयुष्यभर जे कमावले होत ते मुलांनी मिनिटांमध्ये घालवले, असेही खडसेंनी म्हटले आहे. मात्र खडसेंच्य या वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.
एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे भाजपला खूश करण्यासाठी खडसेंनी असं वक्तव्य केले का? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे.
ज्या धनुष्यबाणाच्या जोरावर अनेक सत्ता केंद्रांवर शिवसेनेनं सत्ता काबीज केली आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून देखील त्याचा मुख्यमंत्री झाला. दोघांच्या भांडणात वर्षानुवर्षात कमावलेली पुण्याई गोठवली गेली आहे. मला वाटत यापेक्षा दुर्दैव प्रसंग नसावा, असं खडसेंनी म्हटले आहे.
वाडवडिलांनी आयुष्यभर जे कमावलं होत ते मुलांनी मिनिटांमध्ये घालवलं. त्याला कोण जबाबदार आहे कोण नाही हे निवडणूक आयोगाचा निर्णय आला तर समजेल. परंतु निवडणूक चिन्ह तात्पुरता का होईना गोठवल हे अत्यंत दुःखदायक गोष्ट आहे. असं एकनाथ खडसे म्हणाले आहे.
COMMENTS