मतदानासाठी उरले अवघे सहा दिवस | रविवारी मतदान अहमदनगर | नगर सह्याद्री आरोपांची चिखलफेक, पत्रकबाजी, उणी धुनी काढण्यासाठी सोशल मिडीयाचा वा...
मतदानासाठी उरले अवघे सहा दिवस | रविवारी मतदान
अहमदनगर | नगर सह्याद्री
आरोपांची चिखलफेक, पत्रकबाजी, उणी धुनी काढण्यासाठी सोशल मिडीयाचा वारेमाप वापर होत असल्याने शिक्षक बँकेची निवडणूक चांगली गाजली आहे. प्रमुख चारही मंडळांनी बँकेची सत्ता भोगल्याने दुसर्याला वाईट म्हणण्यासाठी स्पर्धाच सुरु आहे.
जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या २१ संचालकांसह विकास मंडळाच्या १८ जागांसाठी १६ ऑटोबरला मतदान होणार असून १७ आक्टोबरला मतमोजणी होणार आहे. शिक्षक बँकेसाठी साडेदहा हजार सभासद आहेत. बँकेच्या निवडणुकीत प्रमुख चार मंडळ असून त्या मंडळांना इतरांनी पाठिंबा दिला आहे. सत्ताधारी बापूसाहेब तांबे यांचे गुरुमाऊली मंडळ, रावसाहेब रोहोकले यांचे गुरुमाऊली मंडळ, संजय कळमकर - संजय धामणे यांचे गुरुकुल, व राजेंद्र शिंदे यांचे सदिच्छा मंडळ असे प्रमुख चार पॅनेल बँकेची निवडणूक लढवत आहेत. तांबे यांच्या गुरुमाऊली मंंडळाची ऐक्य मंडळ, शिक्षक भारती, एकल शिक्षक संघटना यांच्याशी युती आहे. गुरुकुलची स्वराज्य मंडळाशी युती आहे. सदिच्छा मंडळाची इब्टा, थोरात गट, साजिर मंडळ यांच्याशी युती आहे. जिल्ह्यात ३० केंद्रांमध्ये मतदान होणार आहे.
COMMENTS