शुक्रवारी पावसाची जिल्ह्यात सर्वदूर हजेरी अहमदनगर | नगर सह्याद्री राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ...
शुक्रवारी पावसाची जिल्ह्यात सर्वदूर हजेरी
अहमदनगर | नगर सह्याद्री
राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. बळीराजाच्या हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला गेला आहे. शुक्रवारी पारनेर, नगर, श्रीगोंदा, जामखेड तालुक्यात दमदार पाऊस झाला. पावसामुळे नद्या वाहत्या झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता.
गेल्या दहा - पंधरा दिवसांपासून नगर जिल्ह्यात परतीचा दमदार पाऊस होत आहे. सतत होत असलेल्या पावसामुळे शेतकरी वैतागला असून पिके सडून गेली आहेत. यात शेतकर्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारी जिल्ह्यात १० मिलीमिटर पाऊस झाला. तर जिल्ह्यात आत्तापर्यंत सरासरी १३५ टक्के पाऊस झाला आहे.
शुक्रवारी सकाळीपासून नगरमध्ये पावसाने सुरुवात केली होती. या पावसामुळे सीना नदीला पूर आला होता. तब्बल २० तास नगर-कल्याण रोडवरील पुलावरुन वाहतूक बंद होती. शुक्रवारी पहाटे पारनेर तालुक्यात धुवाँधार पाऊस झाला.
COMMENTS