संतोष वर्मा यांची मागणी अहमदनगर | नगर सह्याद्री राज्यात सत्तापालट झाल्यानंतर नागरिकांचे प्रश्न सोडवणारे राधाकृष्ण विखे राज्याचे महसूल मंत्र...
संतोष वर्मा यांची मागणी
अहमदनगर | नगर सह्याद्रीराज्यात सत्तापालट झाल्यानंतर नागरिकांचे प्रश्न सोडवणारे राधाकृष्ण विखे राज्याचे महसूल मंत्री झाल्याने नागरिकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. नगर शहरासह नगर मनमाड रस्त्यांची तातडीने दुरुस्तीसाठी मंत्री विखे यांनी पुढाकार घेऊन त्वरित रस्ते खड्डेमुक्त करावेत, अशी मागणी भारतीय सुवर्णकार समाज संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष वर्मा यांनी महसूलमंत्री विखे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत संतोष वर्मा यांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांना इमेलद्वारे निवेदन पाठवून वरील मागणी केली आहे. नगर शहरातील सर्वच रस्त्यांची दनानीय अवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. तसेच नगर मनमाड रस्त्याची भयंकर अवस्था झाली आहे. ठेकेदार काम अर्धवट सोडून गेल्याने काम थांबले आहे. वाहनचालकांना मोठा त्रास होत आहे. महापालिका व जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.
COMMENTS