अहमदनगर । नगर सह्याद्री चौघे मित्र हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले असता त्यांच्यात वाद झाला. त्यातील एकाने दुसर्याच्या डोक्यात दारूची बा...
अहमदनगर । नगर सह्याद्री
चौघे मित्र हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले असता त्यांच्यात वाद झाला. त्यातील एकाने दुसर्याच्या डोक्यात दारूची बाटली फोडून जखमी केले. किरण सुंदर उरमुडे (वय 33, रा. भोयरेपठार, ता. नगर) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
मंगळवारी दुपारी केडगाव बायपास रोडवरील कोकण किंग हॉटेलमध्ये ही घटना घडली. जखमी उरमुडे यांनी कोतवाली पोलिसांना दिलेल्या जबाबावरून राम पावसे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी उरमुडे त्यांचे मित्र गणेश चौधरी, अविनाश भिंगारदिवे व राम पावसे यांच्या सोबत केडगाव येथील कोकण किंग हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. हॉटेलमध्ये जेवण करत असताना पेमेंट व बोनसवरून त्यांच्यात वाद झाला. वादातून राम पावसे याने उरमुडे यांच्या डोक्यात दारूची बाटली फोडली. त्यांच्या खिशातील नऊ हजार रूपयांची रक्कम घेऊन तो पसार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.
COMMENTS