अहमदनगर | नगर सह्याद्री भांडण मिटविणार्याला फायटरने मारहाण केल्याची घटना ८ ऑटोबरच्या रात्री केडगाव उपनगरात घडली. मनोज सुरेश शिरसाठ (वय ३०...
अहमदनगर | नगर सह्याद्री
भांडण मिटविणार्याला फायटरने मारहाण केल्याची घटना ८ ऑटोबरच्या रात्री केडगाव उपनगरात घडली. मनोज सुरेश शिरसाठ (वय ३० रा. शास्त्रीनगर, केडगाव) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहे.
उपचारादरम्यान त्यांनी कोतवाली पोलिसांना दिलेल्या जबाबावरून दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक शेलार व अनिल शिंदे (पूर्ण नावे माहिती नाही, दोघे रा. शास्त्रीनगर, केडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. २४ सप्टेंबरला केडगाव देवी येथे मनोज शिरसाठ यांच्या मित्राच्या भावाचे भांडण झाले होते. ते भांडण मनोज यांनी मिटविल्याने दीपक व अनिल यांनी मनोज यांना शिवीगाळ केली होती. ८ ऑटोबरला रात्री याच कारणातून मनोज यांना दीपक व अनिल यांनी तू येथील समाजसेवक आहे का, येथील भांडणे मिटवतो का, असे म्हणत शिवीगाळ, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अनिल शिंदे याने मनोज यांना फायटरने मारहाण केली. मनोज यांची आई भांडण सोडविण्यास आली असता त्यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
COMMENTS