अहमदनगर | नगर सह्याद्री नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने ऐन सणासुदीच्या काळात व्यापारी वर्गाला वेठीस धरण्याचा आणि विनाकारण त...
अहमदनगर | नगर सह्याद्री
नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने ऐन सणासुदीच्या काळात व्यापारी वर्गाला वेठीस धरण्याचा आणि विनाकारण त्रास देण्याचा उद्योग सुरू केला आहे. बाजार समितीचे काही अधिकारी सुरक्षा रक्षकांसह अचानक मार्केट यार्डमधील दुकानात येऊन दप्तर, संगणक, वह्या तपासणीची मागणी करत आहेत. व्यापारी वर्गात दहशत निर्माण करून अपराधी वागणूक देण्यात येत आहे. याविरोधात व्यापारी वर्गाच्या शिष्टमंडळाने आमदार संग्राम जगताप यांची भेट घेऊन समस्या मांडल्या. आमदार जगताप यांनी याची गंभीर दखल घेत मार्केट कमिटीचे प्रशासक रत्नाळे यांच्याशी फोनवरून चर्चा करत जाब विचारला. रखडलेली कामे मार्गी लावण्यास सांगितले. त्यावर प्रशासक रत्नाळे यांनीही सर्व प्रश्न येत्या आठवडाभरात सोडवण्याचे आश्वासन दिल्याने व्यापार्यांना दिलासा मिळाला आहे.
यावेळी राजेंद्र चोपडा, विजय गांधी, राजमल चंगेडिया, अमोल पोखरणा, विजय कोथिंबीरे, अजय फिरोदिया, किसन गांधी, चांदमल मुथा, प्रितम चंगेडिया, किशोर श्रीश्रीमाळ, शैलेश चंगेडे, अनिल लुंकड, शांतीलाल गुगळे, ललित गुगळे, योगेश चंगेडिया, अनिल लुंकड, रमेश सोनी मंडलेचा, सचिन वाघ, किशोर देसरडा, हमीद खान, रमेश बोथरा, सुनिल कटारिया, शैलेश गांधी, धनेष कटारिया, प्रशांत गांधी, आनंद पितळे, अभय पुंगलिया, आशिष चोपडा, राजेंद्र भंडारी, सचिन मुथियान, विजय कटारिया, राजू थोरात, हर्षल चंगेडिया, रितेश पारख, किशोर कटारिया, विजय गुगळे आदी उपस्थित होते.
राजेंद्र चोपडा म्हणाले, कोरोना महामारीमुळे दोन वर्षे बाजारपेठेवर मंदिचे सावट होते. यावर्षी परिस्थिती बर्यापैकी असताना बाजार समिती प्रशासनाकडून अन्यायकारक पद्धतीने व्यापारी वर्गाला त्रास दिला जात आहे. ्व्यापाराना येणार्या समस्या आ. संग्राम जगताप यांनी गांभिर्याने घेतल्या. विजय कोथिंबीरे, शांतीलाल गुगळे, शैलेश गांधी, विजय गांधी, अमोल पोखरणा यांनी व्यापार्यांच्या वतीने विस्तृत मांडणी केली. आमदार जगताप यांनी लगेचच अधिकार्यांना फोन करून जाब विचारला. तसेच सोमवारी संयुक्त बैठक घेऊन व्यापारी वर्गाच्या समस्या मार्गी लावण्याची ग्वाही दिली.
COMMENTS