मुंबई । नगर सह्याद्री - नार्कोटिस कंट्रोल ब्युरोच्या विशेष तपास पथकाने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात धक्का...
मुंबई । नगर सह्याद्री -
नार्कोटिस कंट्रोल ब्युरोच्या विशेष तपास पथकाने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात धक्कादायक खुलासा केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयात पाठवलेल्या अहवालात या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने झाला नसल्याचे म्हटले आहे.
त्यावेळी जे अधिकारी कार्यरत होते ते आजही कार्यरत आहे. त्यांच्या कामातील अनेक त्रुटी तपासादरम्यान समोर आल्याचा दावाही अहवालात करण्यात आला आहे. या प्रकरणात सात ते आठ अधिकार्यांची भूमिका तपास पथकाला संशयास्पद वाटली आहे. याप्रकरणी विभागीय चौकशी सुरू झाली आहे. आणखी दोन प्रकरणांतही या अधिकार्यांची संशयास्पद भूमिका समोर आली आहे. याशिवाय एनसीबीच्या बाहेर असलेल्यांवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ अधिकार्यांकडून परवानगी मागितली आहे.
या वर्षी मे महिन्यात आर्यन खानला एनसीबीने लीन चिट दिली होती. त्याच्या आणि इतर पाच जणांविरुद्ध पुरेसे पुरावे नाहीत, असे म्हटले होते. गेल्या वर्षी २ ऑटोबरला मुंबईतील एका क्रूझमधून अटक केलेल्या २० जणांमध्ये आर्यनचा समावेश होता. यापैकी काही लोकांकडे ड्रग्ज सापडले होते. नोव्हेंबर २०२१ मध्ये एनसीबी मुख्यालयाने समीर वानखेडेकडून तपास काढून घेतला होता.
गेल्या वर्षी २ ऑटोबरच्या रात्री एनसीबीने मुंबईहून गोव्याला जाणार्या कॉर्डिअल क्रूझ शिपवर जाणार्या रेव्ह पार्टीवर छापा टाकून अंमली पदार्थांच्या खरेदीच्या आरोपाखाली आर्यन खानसह मुनमुन धमेचा, अरबाज मर्चंटसह अनेकांना अटक केली होती. आर्यन आणि त्याच्या साथीदारांना २८ ऑटोबरला जामीन मंजूर करण्यात आला होता. अरबाज मर्चंटने सांगितले होते की, त्याच्याकडून जप्त केलेले ड्रग्ज आर्यन खानसाठी नव्हते. ही माहिती एनसीबीचे डीजी संजय सिंह यांनी आपल्या निवेदनात दिली होती. ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर आर्यनची वैद्यकीय तपासणी झाली नाही. त्यामुळे आर्यनने स्वतः ड्रग्ज घेतले होते की नाही हे सिद्ध होऊ शकले नाही.अरबाजने आपल्या वक्तव्यात असेही म्हटले होते की, आर्यनने क्रूझवर ड्रग्ज घेऊन जाण्यास नकार दिला होता. आर्यनला ड्रग्जचा पुरवठा करण्याबाबत एकाही ड्रग्ज तस्कराने म्हटले नाही. या वर्षी मे महिन्यात एनसीबीने एक प्रेस नोट जारी करून आर्यनला लीन चिट देण्यास सहमती दर्शवली होती. हे आरोपपत्र समोर आल्यानंतर सुरुवातीला तपासाचे नेतृत्व करणारे एनसीबीचे संचालक समीर वानखेडे चौकशीच्या कक्षेत आले. आरोपपत्रानुसार एसआयटीच्या तपासादरम्यान क्रूझवरील छाप्यातही अनेक अनियमितता आढळून आल्या आहेत. कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे झोनल डायरेटर समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर ही एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.
COMMENTS