महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय आमदार चषक तलवारबाजी अजिंय स्पर्धेचे पारितोषिक वितरण अहमदनगर | नगर सह्याद्री ऑलम्पिक स्पर्धे...
महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय आमदार चषक तलवारबाजी अजिंय स्पर्धेचे पारितोषिक वितरण
अहमदनगर | नगर सह्याद्रीऑलम्पिक स्पर्धेमध्ये खेळाचे विविध प्रकार सामाविष्ट झालेले आहे. त्यामुळे शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्याला क्रीडा स्पर्धेमध्ये करिअर करण्याच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आ. संग्राम जगताप यांनी क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ते क्रीडा स्पर्धेचे आयोजन करत आहे ही बाब कौतुकास्पद आहे. खेळाडूंना योग्य मार्गदर्शन व खेळाचा सराव करण्यासाठी खेळाचे साहित्य उपलब्ध होणे गरजेचे आहे. खेळाडूंना योग्य वयात योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये तलवारबाजी खेळाचे साहित्य उपलब्ध करून देणार आहे. नगर शहरातील बॅटमिंटन हॉल पाहून मनाला आनंद झाला. आ. संग्राम जगताप शहरामध्ये खेळाडूंसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करून व्यासपीठ निर्माण करून देत आहे असे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले.
महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय आमदार चषक तलवारबाजी अजिंय स्पर्धेचे पारितोषिक वितरण भारतीय फेन्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी आ. संग्राम जगताप, उपसंचालक महादेव कसगावडे, अशोक दुधारे, प्राध्यापक उदय डोंगरे, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, राजकुमार सोमवंशी, अभिजीत खोसे, प्रकाश काटूळे, प्रा. दिलीप घोडके, असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष शिवप्रसाद घोडके, उपाध्यक्ष सुनील गोडलकर, सचिव प्रा. संदेश भागवत, रोहित कसबे, राहुल रुईकर, श्रुती जाधव आदींसह राज्यभरातील प्रशिक्षक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. संग्राम जगताप म्हणाले की, नगर शहरामध्ये राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन होणे गरजेचे आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू घडला जातो नगर शहरामध्ये लवकरच स्पोर्ट कॉम्प्लेस चे काम पूर्ण होऊन खेळाडूंसाठी खुले केले जाणार आहे. या ठिकाणी विविध खेळाची मैदाने तयार होणार आहेत याचबरोबर खेळाचे योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी प्रशिक्षकाची नेमणूक केली जाणार आहे खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आमदार चषकाचे आयोजन केले जाते. क्रीडा संघटनेच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाते मा. मंत्री सतेज पाटील यांनी असोशियनच्या माध्यमातून तलवारबाजी खेळाला प्रोत्साहन मिळावे यासाठी ते काम करत आहेत असे ते म्हणाले.
महाराष्ट्र फेन्सिंग व नगर जिल्हा असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय आमदार चषक तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेमध्ये मुलांमध्ये औरंगाबाद प्रथम, बुलढाणा दृतिय व बीड तृतीय क्रमांकावर विजय संपादित केला. तर मुलींमध्ये लातूर प्रथम, नागपूर दृतिय व औरंगाबाद तृतीय क्रमांकावर विजय संपादित केला. यावेळी राज्यभरातील खेळाडू मोठे संख्येने उपस्थित होते.
COMMENTS