अहमदनगर | नगर सह्याद्री सुशोभीकरणाच्या कामातून शहर सौंदर्यीकरणात भर पडणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. मनपा महिला बा...
सुशोभीकरणाच्या कामातून शहर सौंदर्यीकरणात भर पडणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
मनपा महिला बालकल्याण समितीच्या उपसभापती मीनाताई चोपडा यांच्या प्रयत्नातून आदर्श कॉलनी येथे पेव्हिंग ब्लॉक व सुशोभीकरण कामाचा शुभारंभ आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी उपमहापौर गणेश भोसले, मर्चंट बँकेचे मा. चेअरमन मा. नगरसेवक संजय चोपडा, वर्धमान गांधी, धीरज मनोत, मनोज लूनावत, योगेश पाटील, सचिन काबरा, डॉ.देशमुख, मनीष मुथा, प्रतीक पाचपुते, अजय पिसुते, मनीष गुगळे, विशाल दाभाडे, सचिन गुगळे, राजेंद्र चुंग, अनिल भंडारी, संजीव गुंदेचा, गौरव भिंगारवाला, विनोद मोनोत, संदीप शिंगवी, वैभव गांधी, अनिल गाडे, आदी उपस्थित होते.
मनपा महिला बालकल्याण समितीच्या उपसभापती मीनाताई चोपडा यांच्या प्रयत्नातून प्र. क्र.१४ मधील आदर्श कॉलनी येथे पेव्हिंग ब्लॉक व सुशोभीकरण कामाला सुरुवात झाली आहे. विकास कामे करीत असताना नियोजन पूर्वक व्हावी जेणेकरून ती विकास कामे पुन्हा पुन्हा करण्याची गरज भासणार नाही जमिनी अंतर्गातील पिण्याच्या पाण्याच्या लाईन, ड्रेनेज लाईन, रस्ता विकसित करणे आदि कामे मार्गी लागणे गरजेचे आहे ही कामे पूर्ण झाल्यानंतर कॉलन्यांच्या सुशोभीकरणाची कामे हाती घ्यावी आदर्श कॉलनीतील सर्व कामे मार्गी लागल्यामुळे उपसभापती मीनाताई चोपडा यांनी पेव्हिंग ब्लॉक व सुशोभीकरणाचे काम हाती घेतले आहे सुशोभीकरणाच्या कामामुळे परिसराला सौंदर्यकरणाचे रूप प्राप्त होईल त्यामुळे शहराच्या एका एका भागाचे नियोजन करून कायमस्वरूपी चे विकासाचे प्रश्न मार्गी लावू व शहर स्वच्छ,सुंदर व हरित करण्यासाठी प्रयत्न करू विकास कामे करीत असताना नागरिकांच्या सहकार्याची खरी गरज आहे. त्यांनी पुढाकार घेऊन चांगल्या कामांमध्ये आपले योगदान द्यावे असे आ. जगताप यांनी सांगितले.
यावेळी उपसभापती मीनाताई चोपडा म्हणाल्या की, आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चारही नगरसेवक विकास कामांसाठी कटिबद्ध आहोत एका विचाराने प्रभागातील विकासाचे एक एक प्रश्न मार्गी लावत आहोत प्रभागाच्या सौंदर्यकरणात भर पडावी यासाठी कॉलनी अंतर्गत पेव्हिंग ब्लॉक व सुशोभीकरणाची कामे सुरू केली आहे. आदर्श कॉलनीतील इतर विकासाची कामे मार्गी लावली असल्यामुळे पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचे काम सुरू केले आहे त्यामुळे आदर्श कॉलनी ला सौंदर्य करण्याचे रूप प्राप्त झाले आहे असे त्या म्हणाल्या.
COMMENTS