महाराष्ट्र एकीकरण पदाधिकार्यांशी साधला संवाद पारनेर | नगर सह्याद्री बेळगांव सीमाप्रश्न हा अनेक वर्षापासून वादात असुन बेळगांव सीमाप्रश्नी ...
महाराष्ट्र एकीकरण पदाधिकार्यांशी साधला संवाद
पारनेर | नगर सह्याद्रीबेळगांव सीमाप्रश्न हा अनेक वर्षापासून वादात असुन बेळगांव सीमाप्रश्नी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठविणार असल्याची ग्वाही आमदार नीलेश लंके यांनी दिली आहे. बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण पदाधिकार्यांनी आ. लंके यांच्याशी संवाद साधला.
वरवर आनंदी-शांत-तरल दिसणारे बेळगाव आतून मात्र ज्वालामुखीसारखे धगधगत आहे. याचा अंदाज फार कमी मराठीजनांना असेल. मागच्या काही वर्षात कर्नाटक सरकार ह्या भागात कानडी संस्कृती रुजवण्याचा पुरेपुर प्रयत्न करत आहे. कानडीची सक्ती, सनदशील आंदोलनं पोलिसी ताकदीच्या जोरावर चिरडणं वगैरे या डावपेचाचे भाग आहेत. बेळगाव सीमाप्रश्नाचा सोक्षमोक्ष लागावा असे मलाही मनापासून वाटते असे आ. लंके म्हणाले. त्याकरिता माझ्या परीने जे कांही करता येईल ते करणार असून नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात या विषय संदर्भात आपण आवाज उठवू असे आश्वासन दिले आहे.
सीमाप्रश्न हा तुम्हा आम्हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. हा केवळ सीमावासियांचाच नव्हे तर माझा माझ्या कुटुंबाच्या प्रश्न आहे. या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मी कटिबद्ध आहे. या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लागावा असे मला मनापासून वाटते. त्याकरिता जे जे करता येईल ते ते मी करेन. सीमा भागातील आमदार, खासदार या संदर्भात आपल्याला मदत करतील ही अपेक्षा न केलेली बरी. तेंव्हा आपण शरद पवार यांच्या सल्ल्यानुसार थेट राष्ट्रपतींची भेट घेऊन भाषिक अल्पसंख्यांक आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात मागणी करू. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. लंके यांना आंतरराज्य सामाजिक सेवा पुरस्कार
नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फौंडेशन, बेळगाव-चिक्कोडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या आंतरराज्य पुरस्कार सोहळ्यात कोरोना काळात माणुसकीची जाणीव ठेऊन आ. नीलेश लंके यांनी केलेल्या कार्याची दखल घेत सन्मानचिन्हाने आ. लंके यांचा सन्मान करण्यात आला. पुरस्कार गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी खा. आनंदराव अडसूळ, केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, माजी आ. संजय पाटील, माजी खा. अमरसिंह पाटील, राजू शिंगाडे, जिल्हा कमांडंट अरविंद घट्टी, महेश मेघण्णावर, विलास पाटील, डॉ. पवन शर्मा, शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
COMMENTS